How To Lose Belly Fat And Weight Loss After 40 Age; ४० व्या वर्षी पोटाची चरबी वितळविण्यासाठी लावा ७ सवयी, झरझर होईल वजन कमी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अधिक अ‍ॅक्टिव्ह राहा

अधिक अ‍ॅक्टिव्ह राहा

डॉ. भागवत यांनी सांगितले की, तुम्हाला ४० वयानंतर जर वाटत असेल की आपलं सुटलेलं पोट कमी व्हावं आणि सपाट दिसावं अथवा वजन वाढू नये तर यासाठी अधिक प्रमाणात तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहणं गरजेचे आहे. असं केल्यामुळे कॅलरी जास्त प्रमाणात जळते आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होते.

प्रोटीन अधिक प्रमाणात खा

प्रोटीन अधिक प्रमाणात खा

तुम्ही वाढत्या वयासह प्रोटीन आहारात अधिक घेतल्यास हे केवळ वजन आटोक्यात राहण्यास मदत करत नाही तर वाढत्या वयासह कमकुवत होणाऱ्या मसल्सनादेखील मजबूत करण्यास याची मदत मिळते. त्यामुळे झरझर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन अधिक प्रमाणात खावे आणि ही सवय अंगिकारावी.

(वाचा – मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्तीच्या ३ स्टेप्स कोणत्या प्रत्येक महिलेला माहीत हवेच)

घरी बनवा जेवण

घरी बनवा जेवण

तुम्ही जेवण स्वतः बनवत नसाल आणि आपल्या डाएटसाठी तुम्हाला जर बाहेरच्या व्यक्तींवर अवलंबून राहावे लागत असेल तर असं अजिबात करू नका. आपल्या डाएटिशियनकडून योग्य डाएट मिळाल्यानंतर योग्य पद्धतीने फॉलो करण्यासाठी स्वतः घरी जेवण बनवा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.

(वाचा – वजन वाढल्याने त्रस्त असाल तर प्या वासयुक्त पदार्थाचा चहा, उपाशीपोटी प्यायल्याने वजन येईल सर्रकन कमी)

कॅलरीकडे द्या लक्ष

कॅलरीकडे द्या लक्ष

तुम्ही तुमच्या आहारात किती कॅलरी खाताय याकडे नीट लक्ष दिले आणि मोजले तर तुम्ही सहजपणाने वजन कमी करू शकता. अतिरिक्त कॅलरी पोटात जाणे योग्य नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. अधिक कॅलरीयुक्त खाणे सहसा टाळावे अथवा खाऊच नये.

(वाचा – पावसाळ्यात सर्रास होणारे बुरशीजन्य संसर्ग, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान)

हायड्रेटेड रहा

हायड्रेटेड रहा

स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी अधिकाधिक पाण्याचे सेवन करा. तसंच महिलांनी कमीत कमी २-३ लीटर पाणी आणि पुरूषांनी दिवसातून ४ लीटर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून पोट सपाट होण्यास मदत मिळते. तसंच अति भूक लागत नाही.

चालण्यावर अधिक भर द्या

चालण्यावर अधिक भर द्या

कॅलरी जाळण्यासाठी जिममध्ये जाऊन कठीण व्यायामाचीच गरज भासते असं नाही. वयाच्या ४० व्या वर्षानंतरही तुम्ही कार्डिओ वर्कआऊट अथवा चालण्यावर अधिक भर द्या. तसंच चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे या व्यायामाकडे अधिक लक्ष दिल्यास, पोटावरील चरबी कमी करून वजन कमी करण्यास फायदा मिळू शकतो.

योग्य झोप गरजेची

योग्य झोप गरजेची

दिवसभर काम करून आपला मेंदू थकतो आणि मग आपल्याला साखर खावीशी वाटते. त्यामुळे तुम्ही दिवसभरात ८ ते १० तास झोप पूर्ण करणे गरजेचे आहे. मेंदू आणि शरीराला योग्य आरामाची गरज आहे आणि ती झोपेमुळेच पूर्ण होते. वजन वाढू द्यायचे नसेल तर हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

[ad_2]

Related posts