प्रियकरासह हातात हात घालून फिरत होती पत्नी; तितक्यात पती तिथे पोहोचला अन् रंगेहाथ पकडलं, मॉलमध्ये एकच राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दिल्ली मेट्रो स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, पत्नी आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं. पत्नी प्रियकराचा हात हातात घेऊन फिरत असताना पती तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, पतीला पाहिल्यानंतर सुरुवातीला घाबरलेल्या पत्नीने नंतर मात्र त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या पतीला शिवीगाळही केली. 

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, दिल्ली मेट्रोच्या स्थानकावर महिला आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांचा पाठलाग करत व्हिडीओ रेकॉर्ड केला. दरम्यान, व्हिडीओत ऐकू येत आहे त्याप्रमाणे पाठलाग करताना पती एका व्यक्तीला विचारतो की, “अंकल, इथे मला कोणाची मदत घ्यायची असेल तर कोणाची घेऊ? कारण ती माझी बायको आहे, जी मला सोडून पळून गेली आहे. आता बघा कशी आपल्या प्रियकराचा हात पकडून फिरत आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत आहे. पण आज माझ्या तावडीत सापडली आहे”.

यावेळी प्लॅटफॉर्मवरुन जाणारी एक व्यक्ती पतीला फोन करण्याचा सल्ला देते. यावर महिलेचा पती असल्याचा दावा करणारी व्यक्ती म्हणते, “फोन उचलत नाही. तिने मला ब्लॉक केलं आहे. आणि इथे त्याच्यासोबत फिरत आहे”. 

यादरम्यान एक व्यक्ती पुढे जाऊन बायकोला थांबवण्याचा सल्ला देते. त्याचवेळी महिला खरेदी करण्यासाठी एका दुकानात थांबते. तेव्हा पती तिला आवाज देऊन विचारतो, “झालं का फिरुन”. पतीचा आवाज ऐकताच महिलेला आश्चर्याचा धक्का बसतो. नंतर मात्र ती त्याला उत्तर देत, हो फिरली, मग काय झालं? अशी विचारणा करते. त्यावर पती तिला म्हणतो, “मी तुझा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. आता कोर्टात भेट तू”.

यानंतर महिला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱी व्यकी म्हणजेच तिच्या पतीमध्ये मारहाण सुरु होते. यावेळी तिथे उपस्थित असणारे लोक मध्यस्थी करतात. त्यावेळी पती त्यांना सांगतो की, “हिने पळून जाऊन माझ्याशी लग्न केलं होतं. लव्ह मॅरेज केलं आणि आता माझ्या आयुष्याची वाट लावली आहे”. त्यावर महिला त्याला उत्तर देत घटस्फोट तर मी घेणारच आहे असं सांगते. 

पतीचा दावा आहे की, तो बुराडी सुल्तानपुरीचा निवासी आहे. यावेळी तो तिथे उपस्थित लोकांना हा व्हिडीओ व्हायरल करण्याचं आवाहन करतो. यानंतर पत्नीला पकडून दिल्लीच्या नांगलोई पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं तो सांगतो. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्याच्यावर कमेंट करत आहेत. 

Related posts