Negative Energy Sings How To Know It Affects Mental Health As Per Study; तुमच्या शरीरात Negative Energy आहे की नाही कसे ओळखाल, मानसिक आरोग्याला ठरतेय हानिकारक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सतत नकारात्मकतेचा अनुभव

सतत नकारात्मकतेचा अनुभव

Pubmed ने दिलेल्या अहवालानुसार , आपण नकारात्मक विचारांकडे खेचले जातोय हे ओळखण्याचा सर्वात मुख्य संकेत म्हणजे मनात सतत कोणत्याही गोष्टीबाबत नकारात्मक विचार येणे. आपल्या बोलण्याची ढब, त्वरीत उत्तर देताना तोंडातून पहिले नकारात्मक शब्द येणे यावरून हे सिद्ध होते. मनात सतत नकारात्मक विचार, निराशावाद आणि चुकीचा दृष्टीकोन असेल तर तुमच्यात Negative Energy ठासून भरली आहे हे समजून जा.

लहानसहान गोष्टींवर रागावणे

लहानसहान गोष्टींवर रागावणे

तुम्हाला कोणत्याही लहानसहान गोष्टीवर गरज नसतानाही राग येत असेल आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नसेल तर हे केवळ नेगेटिव्ह एनर्जीमुळेच घडत असते. इतकंच नाही तर कोणत्याही गोष्टीचा राग तुम्ही कोणावरही काढत असाल आणि सतत चिडचिड करत असाल तर तुमच्या शरीरात आणि मनात नकारात्मक विचार वाढल्याचे समजून जा. यामुळे अचानक वजन वाढणे अथवा अचानक कमी होणे असंही घडू शकतं.

(वाचा – लेप्टोस्पायरोसिस संसर्ग कसा होतो, लक्षणे आणि कसा घालावा आळा)

रात्री अचानक झोपेतून उठून बसणं

रात्री अचानक झोपेतून उठून बसणं

तुमची झोप अचानक मोडत असेल आणि तुम्हाला अनिद्रेची समस्या असेल तर तुमच्या आतमध्ये असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे हे घडत असण्याचे संकेत आहेत.

सामाजिक स्तरावर कोणामध्येही न मिसळणं, कुटुंब अथवा मित्रपरिवारापासून दूर राहणं आणि आपण काहीतरी वेगळे समजून सतत स्वतःमध्ये राहणं हे देखील नकारात्मक ऊर्जेचे संकेत असून यामुळे मानसिक संतुलन बिघडते आणि सतत बेचैन राहायला होतं. त्वरीत मानसशास्त्रज्ञांना भेटायला हवं.

(वाचा – गोलमटोल पोट आणि कंबर करायची असेल सपाट तर सुरू करा या ७ पदार्थांचे सेवन)

भूक न लागणं वा नीट न जेवणं

भूक न लागणं वा नीट न जेवणं

तुम्ही जर तुमच्या रूटीनचे चांगले पालन करत नसाल आणि भूक नीट लागत नसेल अथवा कधीही भूक लागत असेल तर नकारात्मक ऊर्जेचा हा संकेत आहे. याचा तुमच्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो आणि तुम्ही वजन वाढून बेढब दिसू लागता. असे संकेत दिसत असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली त्वरीत बदलायला हवी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितला वजन घटवून निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय, भारतीय सुपरफूड्सचा खजिना ठरेल वरदान)

कामाप्रती कमी उत्साह

कामाप्रती कमी उत्साह

तुम्हाला काम करण्यासाठीही उत्साह नसेल आणि बेईमानेने काम पुढे करत असाल तर त्यामागे नेगेटिव्ह एनर्जी हे कारण असू शकतं. डोकंदुखी, थकवा आणि अन्य काही शारीरिक समस्यांमधून याचा संकेत मिळू लागतो. सतत डोकं दुखणे हा महत्त्वाचा संकेत ठरतो.

सतत तक्रारीचा सूर

सतत तक्रारीचा सूर

​प्रत्येक लहानसहान गोष्टीत आपणच बरोबर आणि इतर चुकीचे दाखवत तक्रारी चालू ठेवणं अशा व्यक्ती नकारात्मक उर्जेने भरलेल्या असतात. आपली नोकरी, नाती आणि आरोग्य या सर्वाबाबत अशा व्यक्ती केवळ तक्रारीच करत असतात.

कोणत्याही गोष्टीत अशा व्यक्ती समाधानी नसतात. सतत दुसरा व्यक्ती कसा चुकीचा आहे हेच सांगत राहिल्याने त्यांना बरं वाटतं आणि हे मानसिक आजाराचं कारण ठरू शकतं.

[ad_2]

Related posts