Bhandara Youth dies of heart attack due to overdose of viagara Know side effects for men; भंडाऱ्यात वायग्राच्या अतिसेवाने तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, १० पद्धतीच्या पुरूषांनी कधीच घेऊ नका Viagra जाणून घ्या दुष्परिणाम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​काय प्रकार घडला

​काय प्रकार घडला

नागपूर जिल्ह्यातील भंडारा येथे २७ वर्षीय तरूणाचा लॉजवर मृत्यू झाला. हा तरूण २३ वर्षीय मैत्रिणीसोबत एका लॉजवर गेला होता. त्यावेळी त्याने वायग्रा १०० mg च्या शक्तीवर्धक दोन गोळ्या घेतल्या. म्हणजे तरूणाने एकाचवेळी २०० mg गोळ्यांचं सेवन केलं.

​अतिसेवनाचा दुष्परिणाम

​अतिसेवनाचा दुष्परिणाम

मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी २७ वर्षीय तरूणाने चार पैकी दोन गोळ्यांचं एकाचवेळी सेवन केलं. या सेवनामुळे अचानक रक्तदाब वाढला आणि हृदयविकाराचा झटका आल्याने संपूर्ण शरीर थंडगार पडलं. तरूणाला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

​​(वाचा – रोज आंघोळ करताय? चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या वेळी आंघोळ करणे योग्य, नियम जाणून घ्या)

​१० जणांनी घेऊ नये वायग्रा

​१० जणांनी घेऊ नये वायग्रा

एनएचएसनुसार, १० पद्धतीच्या तरूणांनी वायग्राचे सेवन केल्याने गंभीर साइड इफेक्ट होतात. ​

  • सिल्डेनाफिल किंवा इतर औषधांची ऍलर्जी असलेल्या रुग्णांना
  • छातीत दुखण्यासाठी नायट्रेट औषधे घेत असलेले पुरुष
  • हृदय आणि यकृत रोग असलेले पुरुष रुग्ण
  • स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आलेल्या पुरुषांनीकमी रक्तदाब असलेले रुग्ण
  • दुर्मिळ अनुवांशिक डोळा रोग असलेले रुग्ण
  • सिकलसेल ऍनिमिया, ल्युकेमिया, मल्टिपल
  • मायलोमा यासारखे रक्त कर्करोग असलेले रुग्ण
  • पुरुष जननेंद्रियाच्या विच्छेदन रुग्ण
  • पोटात व्रण ग्रस्त माणूस
  • रक्तस्त्राव समस्या ग्रस्त पुरुष

​कधी आणि कोण घेऊ शकतं

​कधी आणि कोण घेऊ शकतं

वायग्रा ही गोळीचा परिणाम सिल्डेनाफिल ड्रगचा परिणाम ३० ते ६० मिनिटांनी दिसू लागते. शारीरिक संबंध ठेवण्याच्या ४ तास अगोदर गोळी घ्यावी. तसेच १८ ते वयाच्या साठीपर्यंत ही गोळी घेऊ शकता.

​वायग्रा कसे काम करते

​वायग्रा कसे काम करते

वायग्रा घेतल्याने पुरूषांमधील हार्मोन्स अधिक उत्तेजित होतात. तसेच शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा तीव्रतेने वाढते. शक्तीवर्धक गोळी घेतल्यानंतर लिंगाचा आकार वाढतो जो सामान्य स्थितीत येण्यास जवळपास ३ तासांचा कालावधी लागतो.

​(वाचा – मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही)​

​वायग्राचे दुष्परिणाम

​वायग्राचे दुष्परिणाम

वायग्रा या शक्तीवर्धक गोळीचे सर्वाधिक दुष्परिणाम आहेत. याच्या अतिसेवनामुळे बहिरेपणा येऊ शकता. तसेच उलटी, चक्कर, पोट फुगणे, कंबर दुखी, कन्फ्युझन आणि मानसिक संतुलन बिघडणे यासारख्या गोष्टी घडतात.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts