Live टीव्हीवर बुलेटीन वाचत होती अँकर, बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video of Newsroom : देशाच्या-प्रांताच्या सीमा या केवळ माणसांसाठी असतात. पक्षी, नदी, हवा यांना या सीमा लागू होत नसतात आणि प्रेमीयुगलांना तर कोणत्याच परिसिमा लागू नसतात. त्यामुळेच कदाचित सर्वात ताकदवान गोष्ट म्हणजे प्रेम मानली जाते. इच्छाशक्तीला भावनिक साथ मिळाली की, कृष्णरुपी प्रेमांतर कधी होईल आणि संपूर्ण आसमंत हाताच्या चक्रावर फिरवण्याची ताकद अंकूरली जाईल. प्रेमासाठी कोण कुठल्या थरावर जाईल, सांगता येत नाही. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका न्यूजरूमधील हा व्हिडीओ (Viral Video) असल्याचं पहायला मिळतंय.

प्रपोज करताना काय परिस्थिती असते, याची कल्पना सर्वांना असेल. हा ना ची भीती वेगळीच… अशातच एका बॉयफ्रेंडने (Riley Nagel) मोठ्या हिंमतीने आपल्या गर्लफ्रेंडला (Cornelia Nicholson) प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. त्याची गर्लफ्रेंड होती न्यूज अँकर… एक दिवस नेहमीप्रमाणे बुलेटिन वाचत असताना तिच्यासोबत जे काही घडलं. जे पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. एका परदेशी न्यूज चॅनलची प्रसिद्ध अँकर कॉर्नेलिया निकोल्सन लाईव्ह कॅमेऱ्यावर बातम्या वाचत असताना तिला तिच्या प्रियकराकडून सरप्राईज मिळालं. नेमकं काय घडलं पाहा…

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, टेलिप्रॉम्प्टरवर लिहिलेली बातमी वाचताना तिला समजतं की ही माहिती काहीतरी आपल्या संबंधातील आहे. आमचा रिपोर्टर रिले नागेल आम्हाला याबद्दल अधिक माहिती देईल, असं ती म्हणते आणि तिला तिचा बॉयफ्रेंड आठवतो. तेवढ्यात तिच्या पुढील स्क्रीनवर कॉर्नेलिया आणि रिले यांचे फोटो दिसतात अन् तिला हसू फुटतं. त्याचवेळी रिले फुलांचा गुच्छ घेऊन गर्लफ्रेंडजवळ पोहोचतो.

आणखी वाचा – ‘माझा कार्यक्रम आहे… मग मला उत आलाय का?’, भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video

कॉर्नेलिया तू बरोबर बोलली, घरी बसलेल्या लोकांसाठी माझ्याकडे एक खास रिपोर्ट आहे ज्यांना माहित नाही की कॉर्नेलिया आणि मी 4 वर्षांपूर्वी मोंटानामधील एका न्यूज स्टेशनवर भेटलो होतो. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तुझ्याकडे आकर्षित झालो. तुझं व्यक्तिमत्व अप्रतिम आहे, असं म्हणत रिले आपल्या भावना व्यक्त करतो. त्यानंतर तो थेट गुडघ्यावर बसतो आणि माझ्याशी लग्न करशील का? असा थेट प्रश्नच विचारतो.

Video पाहा 

दरम्यान, हा सर्व प्रकार लाईव्ह कार्यक्रमात झाल्याने सर्वांनी हा प्रपोजचा कार्यक्रम पाहिला. त्यानंतर आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रिलच्या धाडसाचं कौतूक केलंय. तर अनेकांनी यावर वात्रट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Related posts