Video : ‘मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा’; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) रोज काही ना काही विचित्र घटना होताना दिसत आहे. कधी बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसमोरच अश्लील कृत्य. अशा विविध कारणांमुळे दिल्ली मेट्रो कायमच चर्चेत असते. महत्त्वाची बाब म्हणजे या अशा घटनांचे कोणीतरी व्हिडीओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले जाते. यामुळे अधिकाअधिक लोक हा सगळा प्रकार पाहत असतात. दिल्ली मेट्रो प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही हे सगळे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळतात. अशातच दिल्ली मेट्रोतील पुन्हा एका नव्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता एवढं भांडणं असो की किंवा काही विचित्र प्रकार हे इतर प्रवासी वाहनांमध्येही होत नसतील तितके दिल्ली मेट्रोत होत आहेत.

नुकताच दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक महिला एका जोडप्याला ओरडताना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कृतीने ही महिला दुःखावली गेली आणि त्यांनी या जोडप्याला सर्वांसमोरच चांगलं सुनावलं आहे. कोणीतरी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.  

व्हायरल व्हिडीओमध्ये मेट्रोच्या डब्यात गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. बरेच लोक उभे राहून प्रवास करत आहेत. दरम्यान, एका वृद्ध महिलेने तेथे उभ्या असलेल्या जोडप्याचा हात पकडून एकमेकांच्या गालावर चिमटे काढल्याने अस्वस्थ झाली होती. ती अचानक त्या मुलीला ओरडू लागते. ‘तू मुलासोबत काय करते आहेस, कधी त्याच्या केसांना हात लावतेय, कधी गालाला हात लावतेय… लोक पण असेच आहेत, इथे कोणी काही बोलत नाही,’ असे ही त्रस्त महिला म्हणताना दिसत आहे.

यानंतर ती मुलगी ‘तुला काय प्रॉब्लेम आहे?’ असे प्रत्युत्तर देते. त्यानंतर ती महिला मुलीला, मी सांगते आहे ना. हे चांगले नाही वाटत. रोमान्स करायचा असेल तर बाहेर जाऊन कर, असे सांगते. त्यानंतर इतर प्रवासी देखील बाहेर जाऊन मुलीला बाहेर जाऊन हे सगळं करा असे म्हणताना दिसत आहेत.

 

दरम्यान, याआधी व्हायरल झालेल्या दिल्ली मेट्रोतील एका व्हिडीओमध्ये एक महिला प्रवासी एका जोडप्यासोबत भांडताना दिसली होती. मेट्रोत बसण्यासाठी एका महिलेनं मुलीला थोडीशी जागा मागितली होती. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी ती महिला तू मला पागल कसा म्हणालास? असे ओरडत होती. महिलेची आरडाओरड पाहून मुलगासुद्धा भडकतो आणि उठून उभा राहतो आणि मी तुला थोडीच म्हणालो असे म्हणाला. त्यावर मुलासोबत असलेली तरुणी त्याला शांत राहायला सांगते. तितक्यात महिला तू काय करशील असे त्याच्यावरच ओरडते.

Related posts