कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिन्याला मिळणार 10 लाख रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com)

प्रत्येकाचा आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी संघर्ष सुरु असतो. आपलं तसंच आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत असतो. काहींना हा पैसा कमावणं सोपं असतं, पण काहींना मात्र आयुष्यभर संघर्ष केल्यानंतरही गरज आहे तितका पैसाही कमावता येत नाही. त्यात वयाचा एखादा ठराविक टप्पा गाठल्यानंतर ही महत्वाकांक्षाही कमी होते. पण यातील काहींना नशिबाची साथ मिळते आणि एका रात्रीत लखपती, करोडपती होतात. असंच काहीसा अनुभव ब्रिटनमधील एका जोडप्याला आला आहे. म्हातारपणात एका रात्रीत त्यांना इतका पैसा मिळाला आहे की, त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. 

30 वर्षं प्रत्येक महिन्याला मिळणार 10 लाख

डॉर्किंग येथील एका वयस्कर महिलेने लॉटरी जिंकली आहे. या लॉटरीमुळे पुढील 30 वर्षांसाठी तिला प्रत्येक महिन्यात 10 लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे आपल्याला 100 वर्षं जगण्याची ऊर्मी मिळाली असल्याचं ही महिला सांगत आहे. 

घरात कोळी पाहिल्यानंतर खरेदी केलं होतं तिकीट

डोरिस यांच्या या लॉटरीमागे कोळी किडा आहे. घराच्या बगिच्यात काही भीतीदायक कोळी पाहिले असता त्यांच्या मनात लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा विचार आला. या कोळींना मनी स्पायडर्स असं म्हणतात. मनी स्पायडर्स ही कोळींची एक प्रजाती आहे. ब्रिटनमध्ये हा मनी स्पायडर दिसल्यास, तुम्हाला पैसा मिळतो अशी मान्यता आहे. 

पार्टी सुरु असतानाच मेल पाहिला अन्…

घरात आणि बगिच्यात मनी स्पायडर दिसल्यानंतर महिलेलाही आता आपल्याला पैसा मिळेल असं वाटू लागलं होतं. आपला 70 वा वाढदिवस साजरा करत असतानाच महिलेला आपण मालामाल झालो असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की “माझ्या 70 व्या वाढदिवसाच्या पार्टीत मी व्यग्र होते. यादरम्यान मी नॅशनल लॉटरीचा ई-मेल पाहिला. मी 1000 रुपये जिंकले असतील असा विचार करुन मी अॅपवर लॉग इन केलं. पण मी मेल पाहिला असता त्यात मी पुढील 30 वर्षांसाठी महिना 10.37 लाख जिंकले असल्याचं लिहिलं होतं. मी पतीलाही जे वाचतेय ते खरं आहे ना अशी विचारलं. माझा विश्वासच बसत नव्हता”.

विश्वास बसत नसल्याने जावयाकडून चेक केला ई-मेल

आपण इतकी मोठी रक्कम जिंकल्यावर महिलेचा विश्वासच बसत नव्हता. यामुळे तिने आपल्या जावयाकडून ई-मेल तपासून घेतला. यानंतर मात्र एकच सेलिब्रेशन सुरु झालं होतं. सकाळी डोरिस यांनी नॅशनल लॉटरीकडून दुजोरा मिळाला. “मला 30 वर्षं इतका पैसा मिळणार आहे यावर विश्वासच बसत नाही. आता माझ्याकडे 100 वर्षं जगण्याचं कारण आहे,” असं महिलेने म्हटलं आहे.

स्विमिंग पूल असणारा व्हिला खरेदी करणार

जिंकल्यानंतर डोरिस आणि किथ यांनी आपल्यासाठी नवा बेड आणि एअरफ्रायर खरेदी केला आहे. तसंच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कॉर्नवालला गेले आहेत. जोडपं आता आपल्या 50 वर्षं जुन्या घराला नव्याने सजवण्याची योजना आखत आहेत. याशिवाय परदेशात जाऊन सुट्ट्या घालवण्याचीही योजना आहे. 70 वर्षीय महिलेने सांगितलं आहे की, ‘या लॉटरीमुळे आता माझी नातवंडं पहिल्यांदा विमानाने प्रवास करती. माझी एका स्विमिंग पूलमध्ये असणाऱ्या व्हिलामध्ये राहण्याची इच्छा होती. आता मी असा व्हिला खरेदी करणार आहे’.

Related posts