Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, कारण या प्रवासासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. 

रेल्वेच्या तुलनेत किमान वेळात कमाल अंतर कापून अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना आता ऐन सुट्टीच्या दिवसांत प्रवासाच्या तिकीट खर्चाचा वाढीव भार सोसावा लागणार आहे. लोकप्रिय (Travel) पर्यटन स्थळांवर पोहोचण्यासाठीचा विमान प्रवास महागल्यामुळं आता सहलीच्या खर्चाची आकडेमोड नव्यानं करावी लागणार आहे. 

मुंबई ते गोवा (Mumbai to goa), मुंबई ते श्रीनगर (Mumbai to srinagar), मुंबई ते अमृतसर (Mumbai to Amritsar)अशा ठिकाणांवर जाण्यासाठीच्या तिकीट दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबई ते श्रीनगर (Mumbai to Srinagar return tickets) या मार्गावर दोन्ही मार्गांनी प्रवास करण्यासाठी 42 ते 50 हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर, मुंबई ते लेह या मार्गावर विनानानं ये-जा करण्यासाठी 26 ते 30 हजार रुपये मोजावे लागत आहेत. पार्टी हब असणाऱ्या गोव्यामध्ये पोहोचण्यासाठी माणसी 7 हजार रुपये ते 13 हजार रुपये एका दिशेच्या प्रवासासाठीचा खर्च येत आहे. 

प्रवासासाठीच्या तिकीट दरांमध्ये इतकी वाढ झालेली असतानाच पर्यटनासाठी राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च त्यात जोडला असता एका सहलीचा अंदाजे खर्च 50 हजार ते 1 लाख रुपयांचा आकडा गाठत असल्यामुळं आता अनेकांनाच घाम फुटत आहे. 

दक्षिणेकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी तुलनेनं कमी दर 

देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांकडे सध्या पर्यटकांचा मोठा कल पाहायला मिळत असून, इथं पोहोचण्यासाठी तितकीच मोठी रक्कमही मोजावी लागत आहेत. तुलनेनं दक्षिणेकडील राज्यांसाठीच्या विमान प्रवासाची तिकीट तुलनेनं कमी आहेत. पण, नियमित दरांपेक्षा मात्र या दरांमध्येही वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. प्राथमिक माहितीनुसार मुंबई ते बंगळुरू या विमान प्रवासासाठी 8500 ते 10000 रुपये इतक्या रुपयांना विमान प्रवासाचं तिकीट मिळतंय. तर, केरळात जाण्यासाठी मात्र काहीशी जास्त म्हणजेच 20 हजार रुपयांच्या घरात जाणारी रक्कम मोजावी लागत आहे. मागणीपेक्षा सध्याच्या घडीला पुरवठा कमी असल्यामुळं सध्या तिकीटांचे दर अडीच पटींनी वाढले आहेत. 

अशा परिस्थितीत Connecting Flights वर भर देत काही प्रवासी प्रवासासाठी जास्त वेळ खर्च करत पैशांची बचत करण्याला प्राधान्य देत आहेत. कनेक्टींग फ्लाईट्सचं उदाहरण घ्यायचं झाल्यास मुंबई ते लेह किंवा श्रीनगरपर्यंत पोहोचण्यासाठीच्या फ्लाईटचं तिकीट महाग पडत असल्यास मध्ये एखादा थांबा थेत तसा प्रवास करावा. यासाठी मुंबई ते पुणे किंवा मुंबई ते दिल्ली आणि तिथून दिल्ली – लेह, दिल्ली – श्रीनगर असा प्रवास तुम्ही करु शकता. यामध्ये वेळ जास्त दवडला जात असला तरीही काही प्रमाणात पैशांची बचत होते हे खरं. 

Related posts