CIDCO Recruitment 2023 Accounts clerk Job For Graduate Marathi News;पदवीधरांनो, तयारीला लागा! सिडकोमध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ असा करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com)

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. यूपीएससीकडून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यूपीएससीने उपसचिव किंवा समकक्ष पदावरून निवृत्त झालेल्या लोकांसाठी ही भरती जाहीर केली आहे. 

भारत सरकारच्या कोणत्याही मंत्रालय किंवा विभागातून 7 व्या CPC (पूर्व-सुधारित GP-7600/- PB-3 मध्ये) नुसार वेतन मॅट्रिक्सच्या स्तर-12 मध्ये पदापासून, उपसचिव किंवा समकक्ष पदावरून निवृत्त असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.  यासोबतच उमेदवारांना भारत सरकारच्या कोणत्याही मंत्रालय किंवा विभागातील डिर्टी सेक्रेटरी किंवा अंडर सेक्रेटरी स्तरावर दक्षता आणि शिस्तभंगाची प्रकरणे हाताळण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन्सवर काम करता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 64 वर्षांपर्यंत असावे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पदभरतीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यावेळी संबंधित कागदपत्रांसह लिफाफ्यावर ‘अ‍ॅप्लिकेशन फॉर एंगेजमेंट अॅज कन्सल्टंट DS/US Level on Contract Basis in UPSC’ असे लिहावे लागेल.

उमेदवारांनी आपले अर्ज केंद्रीय लोकसेवा आयोग, अंडरसेक्रेटरी (प्रशासक), रूम नंबर 11, अ‍ॅनेक्स बिल्डिंग (तळमजला), ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क पदांची भरती

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4 हजार 629 पदे भरली जाणार आहेत. जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील स्टेनोग्राफर, ज्युनिअर क्लर्क, कॉन्स्टेबल, पोर्टर या रिक्त पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र  उमेदवारांना  18 डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाइट याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा  दिलेल्या मुदतीनंतर अर्ज पाठवल्यास तो विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्या.

 

Related posts