( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News: बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूर (Muzafarpur) येथे एका विवाहित महिलेवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला चार मुलांची आई आहे. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी आरोपीला पकडलं. यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी पळ काढत आपल्या घरात जाऊन लपला होता.
पोलिसांनी घराला घेराव घालत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या महिलेवर SKMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. हे प्रकरण मनियारी ठाणे क्षेत्रातील गावात घडली आहे. पीडित महिला आपल्या माहेरी एका लग्नात सहभागी होण्यासाठी दाखल झाली होती.
हात-पाय बांधून तोंड दाबत करण्यात आला बलात्कार
महिला रात्री घरात झोपलेली असताना शेजारी राहणारा 24 वर्षीय तरुण घरात घुसला होता. यानंतर आरोपीने महिलेचे हात-पाय बांधले. यानंतर तिचं तोंड बांधून त्याने बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी महिलेने स्वत:ची सोडवणूक करुन घेतली. हाताला आणि पायाला बांधलेली रशी तिने सोडवली आणि घराबाहेर येऊन आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर शेजारी आणि नातेवाईकांनी आरोपी तरुणाला पकडलं.
पोलिसांना पाहून घरात जाऊन लपला
आरोपी तरुणाला पकडल्यानंतर पोलिसांना महिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी पळाला आणि आपल्या घरात जाऊन लपला. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केलं.
वीट बाजूला करत आरोपी घरात घुसला – पीडित महिला
पीडित महिलेने सांगितलं आहे की, रात्री जेवल्यानंतर आणि मुलांना झोपवल्यानंतर मी झोपण्यास गेले होते. घराचे सर्व दरवाजे बंद होते. पण दरवाजाच्या खाली एक छेद होता, जिथे वीट लावण्यात आली होती. ही वीट बाजूला करत आरोपी प्रवीण घऱात घुसला होता. त्याने घरात घुसल्यानंतर माझे हात-पाय बांधले आणि तोंड दाबून माझ्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तो दरवाजा उघडून पळून गेला. यानंतर मी कसंतरी रशी खोलली आणि बाहेर आल्यानंतर कुटुंबीयांना सांगितलं.
आरोपीविरोधात कारवाई, गुन्हा दाखल
एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितलं आहे की, रविवारी रात्री उशिरा मनियारी पोलीस ठाण्याअंतर्गत एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांना 112 क्रमांकावर फोन केला होता. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं होतं.
आरोपीने घरात घुसून महिलेवर बलात्कार केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करत आरोपीला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचा जबाब नोंदवण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.