Anand mahindra Shared emotional post on x of baby elephant sleeping mothers arms goes viral news in Marathi; कळपापासून दुरावलेलं हत्तीचं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं… मनाला स्पर्श करणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अनमलाई व्याघ्र प्रकल्पात (Anamalai Tiger Reserve)  एका हत्तीच्या पिल्लाची त्याच्या कळपाशी भेट करुन दिल्यानंतरचा अतिशय भावूक फोटो समोर आला आहे. हरवलेलं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं आहे.  राज्याच्या पर्यावरण आणि वन सचिव, सुप्रिया साहू IAS, यांनी हा खास  हृदयस्पर्शी क्षण टिपला आहे.  वन परिक्षेत्र कर्मचार्‍यांनी काढलेल्या फोटोमध्ये हत्तीचं लहान पिल्लू त्याच्या आईच्या उबदार आणि सौम्य मिठीत दुपारची निवांत झोप घेत आहे.

कळपापासून भरकटलं होतं हत्तीच पिल्लू 

काही आठवड्यांपूर्वी आपल्या आईसोबत कळपात फिरणारा हे हत्तीच पिल्लू आपल्या कुटुंबापासून विभक्त झाला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव अधिकाऱ्यांनी बचावाची तयारी सुरू केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती जिथे तो त्याच्या आईसोबत शेवटचा दिसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेऊन सुमारे तीन किलोमीटरपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. जेव्हा अधिकार्‍यांनी त्याला शोधून काढले तेव्हा तो त्याच्या आईला शोधत एकटाच भटकत होता.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, याला सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आणि त्यानंतर आंघोळ करून त्यावर माती टाकण्यात आली जेणेकरून त्यातून माणसांचा वास दूर होईल. यानंतर, हत्तींचा कळप, ज्यामध्ये तिच्या आईचा समावेश होता, शोधून काढण्यात आला आणि त्याला कळपासह सोडण्यात आले. यानंतर हत्तीचे बाळ आपल्या आईला भेटू शकले.

आनंद महिन्द्रा यांच ट्विट 

आनंद महिंद्रा यांनीही सुप्रिया साहू यांचा हा फोटो रिट्विट केला आहे. त्यांनी लिहिले; ‘किती छान फोटो आहे. तुमच्या डॉक्युमेंट्रीसाठा हा शेवटचा फोटो किती छान आणि भावनिक असू शकतो’. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, त्यामुळे यूजर्स भावूक झाले आहेत, त्यांनी हे सुंदर दृश्य पाहून आनंद व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिले, “हत्तीचे बाळ त्याच्या आईसोबत शांतपणे झोपत आहे – प्राण्यांच्या साम्राज्यातील सौम्य, मजबूत बंधनांची हृदयस्पर्शी आठवण.”

दुसर्‍याने कमेंट केली, “ते श्रेय तामिळनाडू वन विभागाच्या प्रत्येक कर्मचार्‍याला आणि स्वयंसेवकांना आहे ज्यांनी या हत्तीच्या पिल्लाला त्याच्या आईशी भेट घालून दिली. हा फोटो पिढ्यानपिढ्या जीवंत राहिल असं त्याने म्हटले आहे. .” तिसरा म्हणाला, “आईच्या प्रेमाच्या कोमल मिठीत, या हत्तीच्या बाळाला दिलासा आणि आधार मिळतो. करुणा आणि सुरक्षिततेचे महत्त्व सांगणारा फोटो.” चौथा म्हणाला: “हे पुर्नमिलन पाहून आनंद झाला.”

Related posts