ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नीला Infosys देणार 68 कोटी रुपये; जाणून घ्या यामागील नेमकं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Akshata Murthy Expected To Earn Rs 68 Crore: माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘इन्फोसिस’कडून (Infosys) शुक्रवारी मोठी घोषणा करण्यात आली. कंपनीने शुक्रवारी आपल्या शेअरहोर्डर्सला डिव्हिडंट (Infosys Dividend) देण्याची घोषणा केली. आर्थिक वर्ष 2022-23 साठी हा डिव्हिडंट दिला जाणार आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची 2 जून 2023 रोजी याला मंजुरी दिली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनेच डिव्हिडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शेअर होलडर्सला डिव्हिडंट दिला जणार आहे. 

‘इन्फोसिस’ बोर्डाने नेमकी काय घोषणा केली?

“बोर्डाने 12 आणि 13 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये फायनल डिव्हिडंट म्हणून प्रत्येक शेअरसाठी 17.50 रुपये दिले जाणार आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी हा डिव्हिडंट दिला जाणार आहे,” असं कंपनीने म्हटलं आहे. डिव्हिडंटसाठीची रेकॉर्ड डेट 2 जून 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच कंपनीने हा डिव्हिडंट शेअर होलडर्सला 3 जुलै रोजी दिला जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. 

अक्षता मुर्तींकडे किती शेअर्स?

डिव्हिडंटच्या नियमांनुसार रेकॉर्ड डेटला ज्यांच्याकडे शेअर्स असतील ते डिव्हिडंटसाठी पात्र ठरतात. जानेवारी आणि मार्च 2023 च्या तिहामाहीच्या आकडेवारीनुसार युनायडेट किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यांचे कंपनीत मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. कंपनीचे 1.07 टक्के शेअर्स अक्षता मुर्ती यांच्याकडे आहेत. म्हणजेच अक्षता मुर्ती यांच्याकडे इन्फोसिसचे 3 कोटी 89 लाख 57 हजार 96 शेअर्स आहेत. 

अक्षता मुर्तींना मिळणार 68 कोटी

कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 17.50 रुपये डिव्हिडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच अक्षता मुर्ती यांना तब्बल 68 कोटी 17 लाख 49 हजार 180 रुपयांचा डिव्हिडंट मिळणार आहे. पुढील महिन्यात त्यांना हा निधी मिळेल. मागील वर्षी अक्षता मुर्ती यांना इन्फोसिसकडून 126 कोटी रुपयांचा डिव्हिडंट मिळाला होता. 

नारायण मुर्तींना किती पैसे मिळणार?

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांच्याकडे कंपनीचे 1 कोटी 66 लाख 45 हजार 638 शेअर्स आहेत. म्हणजेच कंपनीचे 0.46 टक्के शेअर्स नारायण मुर्तींकडे आहेत. त्यामुळे नारायण मुर्तींनाही 29 कोटी 13 लाखांचा डिव्हिडंट मिळणार आहे. 

कोणत्या कंपनीने किती डिव्हिडंट दिला?

इन्फोसिसने सन 2022 मध्ये एकूण 6,309 कोटींचा डिव्हिडंट दिला होता. तर 2021 मध्ये 5,112 कोटींचा डिव्हिडंट दिला होता. एचसीएल टेक्नोलॉजीने सन 2022 मध्ये 11,391 कोटी डिव्हिडंट दिला होता. तर टीसीएसने याच वर्षी 7,686 कोटी डिव्हिडंट दिलेला. 

Related posts