Vitamin B12 Deficiency 4 Super Foods; शरीराला आतून पोकळ करते विटामिन बी१२ ची कमतरता, खा ४ सुपरफुड्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vitamin B12 Deficiency लक्षणे

vitamin-b12-deficiency-

शरीरामध्ये विटामिन बी12 ची कमतरता असल्यामुळे अनेक लक्षणे दिसून येतात. याच्या कमतरतेमुळे शरीरात अत्यंत थकवा जाणवतो. याशिवाय माणूस आळशी होत जातो. त्वचा पिवळी पडणे, स्मरणशक्ती कमी होणे, तोंड येणे, हातापायाला सतत मुंग्या येणे आणि चालायला त्रास होणे यासारखी लक्षणे अधिक प्रमाणात जाणवू शकतात.

तसंच विटामिन बी12 ची कमतरता असेल तर सतत मूड बदलत राहातो आणि सांधेदुखी वाढते. यासाठी नक्की कोणते फूड्स खावे जाणून घ्या.

मासे

मासे

Fish For Vitamin B12 Deficiency: सारडिन्स, टूना आणि साल्मनसारख्या मासे हे Vitamin B12 Deficiency साठी उत्तम पर्याय ठरतात. हे फूड्स खाल्ल्यामुळे मेंदू आणि ब्रेन सेल्ससाठी फायदे होतात. याशिवाय या माशांमध्ये ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड्सपासून ते फॉस्फोरस, सेलनियम, विटामिन ए आणि विटामिन बी२ सारखे पोषक तत्वही आढळतात.

(वाचा – ४७ व्या वर्षीही तिशीचा लुक हवा असेल तर, शिका शिल्पा शेट्टीकडून ही योगासने)

अंडी

अंडी

Eggs For Vitamin B12 Deficiency: एका उकडलेल्या अंड्यामध्ये ०६ Microgram पर्यंत विटामिन बी१२ आढळते. तर शरीरातील याची कमतरता पूर्ण करण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. अंडी शरीरासाठी फायदेशीर असून प्रोटीनचे अधिक प्रमाण यामध्ये असते.

(वाचा – जिने चढण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून पोटाची चरबी कमी करण्यापर्यंत उत्तम पर्याय)

दूध

दूध

Milk For Vitamin B12 Deficiency: दूध आणि दुधापासून तयार झालेल्या पदार्थांमध्ये विटामिन बी१२ चे अधिक प्रमाण असते. विटामिन बी१२ सह दुधाचे उत्पादन हे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन ए, डी, झिंक, पोटॅशियम आणि कॉलिन मिळवून देते.

(वाचा – नसांमधील साचलेली चरबी गाळून टाकेल हा हिरव्या पानांचा काढा, Bad Cholesterol होईल छुमंतर)

पालक

पालक

Spinach For Vitamin B12 Deficiency: अनेक भाज्यांमध्येही विटामिन १२ चे पोषक तत्व अधिक प्रमाणात मिळते. पालक, बीट, मशरूम आणि बटाट्यामध्ये हे प्रमाण अधिक आढळून येते. मात्र सर्वात जास्त Vitamin B12 हे पालकच्या भाजीमध्ये सापडते. त्यामुळे शरीरामध्ये विटामिन बी१२ ची कमतरता जाणवू लागल्यास पालक खावा.

[ad_2]

Related posts