Sundar Pichai यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते? सकाळी उठल्या उठल्या करतात हे काम!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google CEO Sundar Pichai : एखादा विद्यार्थी जेव्हा इंजिनियरिंगला अॅडमिशन घेतो, तेव्हा त्याचं स्वप्न असतं, की आपणही गुगल किंवा मायक्रोसॉफ्स सारख्या कंपनीत काम करावं. भारतात तसं पहायला गेलं तर टॅलेन्टची काहीच कमी नाही. मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये देखील आता भारतीय लोक दिसून येतात. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलमध्ये देखील भारतीय चेहरा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरतोय. होय, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) सध्या प्रत्येक टेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. मात्र, सुंदर पिचाई यांचा इथंपर्यंतचा प्रवास साधा आणि सोप्पा कधीच नव्हता.

मॉर्निंग रुटीन असतं तरी कसं?

गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी नुकतंच एका मुलाखतीत बोलताना आपलं ‘मॉर्निंग रुटीन’ कसं असलं? याची माहिती शेअर केली आहे. देशातील मोठमोठ्या कंपन्यांची माहिती पाहिजे असेल तर वाचन महत्वाचं आहे, असं पिचाई सांगतात. कितीही मोठं झालं तरी वाचन सोडू नये, असं सांगताना पिचाई यांनी एका वेबसाईटचा खुलासा केला. सुंदर पिचाई सकाळी उठल्यावर Techmeme या वेबसाईटला भेट देतात अन् महत्त्वाच्या घडामोडींवर नजर ठेवतात.

मी सकाळी साडेसहा ते सातच्या वेळेत उठतो. वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाइम्सची ऑनलाइन आवृत्ती देखील डोळ्याखालून घातलो. थोडासा व्यायाम आणि नंतर योग्य आहार मी घेतो. सर्वांप्रमाणे टोस्ट आमलेट नाष्टा करतो अन् कामाला लागतो. विदेश प्रवासात काहीवेळा टाईमटेबल बिघडतं, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मोठं क्षेत्र आहे, ते केवळ प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी नाही. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशपणे विचार करणं आवश्यक असल्याचं मत सुंदर पिचाई यांनी मांडलं आहे. भारतात नक्कीच खुप हुशार लोक आहेत, त्यांनी त्यांच्या स्किल्सचा वापर योग्यरित्या केला पाहिजे, असंही पिचाई यांनी (Google CEO Sundar Pichai Advice) भारतात दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

पिचाई कोणता फोन वापरतात?

युट्यूबर अरूण मानी याला नुकतीच पिचाई यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये पिचाई यांना तुम्ही कोणता फोन वापरता असा प्रश्न अरूणने विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पिचाई यांनी नुकताच लॉन्च झालेला गुगलचा पिक्सल फोल्ड (Google Pixel Fold) आपण वापरत असल्याचा खुलासा केला होता.

Related posts