( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर इतकी वर्षं राज्याचं नेतृत्व करणारे शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या मनात कोणताही खेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे एका गोष्टीसाठी परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्रिपदाला रामराम ठोकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाज, उपलब्धी, पक्ष नेतृत्व, प्रशासन या सगळ्यांचा उल्लेख केला. यावेळी भावूक झालेल्या शिवराज सिंह चौहान यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक…
Read More