पुरात भलीमोठी दगडं वाहून गेली पण शंकराचं मंदिर जागचं हललं नाही; जाणून घ्या या ‘केदारनाथ’ मंदिराबद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchvaktra Temple: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या पुराने थैमान घातला आहे. नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. घऱांसह दुकान, इमारतींचंही नुकसान झालं आहे. कुल्लू, मनाली, मंडी सारख्या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची मात्र तुफान चर्चा आहे. कारण या व्हिडीओत पुराच्या पाण्यात शंकराचं मंदिर अगदी भक्कमपणे उभं आहे. पुराच्या पाण्यातही जागेवरुन अजिबात न हालणाऱ्या या मंदिराची चांगलीच चर्चा रंगली आहे.  मंडीमधील या ऐतिहासिक पंचवक्त्र मंदिराने…

Read More