अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जगभरात रोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही चोरी या छोट्य तर काही संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या असतात. देवळापासून ते बँकेपर्यंत चोर एकही जागा सोडत नाहीत. यातील काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने जगासमोर येतात. पण एखाद्या चोराने अंतर्वस्त्र चोरल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता अंतर्वस्त्र कशाला कोण चोरेल असा विचार तुमच्याही मनात आला असेलच. पण खरंच असं घडलं असून सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

थायलंडच्या फुकेतमध्ये महिलांच्या घरासमोरुन सुकत टाकलेली अंतर्वस्त्रं गायब होत होती. यामुळे महिला त्रासल्या होत्या. पण सीसीटीव्हीमुळे चोर हाती लागला असून, सगळेच चक्रावले आहेत. 

महिनच्या सुरुवातीला हा प्रकार सुरु झाला होता. सुरुवातीला एका महिलेला हा अनुभव आला. नंतर मात्र अनेक महिलांसह हा प्रकार घडत असल्याचं लक्षात आलं. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर अखेर चोर पकडला गेला आणि जगासमोर आला. सीसीटीव्ही उघड झाल्यानंतर काही महिलांनी पुढे येऊन आपल्यालाही हा अनुभव आल्याचं सांगितलं आहे. पोलीस आता चोरांचा शोध घेत आहे. 

थायलंडचे पोलीस अधिकारी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरांनी ब्रा, पँटीही सोडल्या नाहीत. मिस नावाच्या एका महिलेने 3 मार्चला चोरी झाल्याची माहिती दिली आहे. 

महिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात आलं. पोलिसांना सीसीटीव्हीत टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला तरुण चोरी करत असल्याचं दिसलं आहे. त्याने आतापर्यंत जवळपास 1846 रुपयांचे ब्रा आणि 2321 रुपयांच्या पँटी चोरल्या आहेत. महिलांनी हे कपडे धुतल्यानंतर घराबाहेर सुकण्यासाठी ठेवले असता चोरण्यात आले होते. 

महिलांनी याप्रकरणी संताप व्यक्त करत भीतीही व्यक्त केली आहे. आता आपल्याला घराबाहेर कोणतेही कपडे सुकत ठेवताना भीती सतावते असं त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना पकडावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस सध्या इतर सीसीटीव्हीही तपासत असून आरोपींना पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. 

Related posts