Success Story SBS Group of Compamies Founder Sanjiv Juneja;आईकडून 2 हजारांची उधारी घेऊन सुरु केला व्यवसाय, बनला अब्जावधींच्या आयुर्वेदिक कंपनीचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story: अनेक भारतीय उद्योगपतींनी शून्यापासून सुरुवात करुन आपला करोडोंचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर कोणतंही काम अशक्य नाही, हे या कहाणीतून आपल्याला दिसते. कोणतीही कथा संघर्षाशिवाय बनत नाही, याचा प्रत्यय तुम्हाला आजची ही कहाणी वाचून येईल. 

SBS ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक संजीव जुनेजा . यांच्या कहाणीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे नेला आणि आकाशाला गवसणी घातली. आजच्या घडीला त्यांच्याकडे अरबोंची संपत्ती आहे, पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की याची सुरुवात २ हजार रुपयांच्या उधारीपासून झाली होती. इतर कोणी नव्हे, तर आपल्या आईकडूनच त्यांनी ही उधारी घेतली होती. 

46 वर्षीय संजीव जुनेजा यांनी कंपनी सुरू करण्यासाठी आईकडून 2,000 रुपये कर्ज घेतले होते. सध्या त्यांची कंपनी जगातील सर्वोच्च आयुर्वेद कंपन्यांमध्ये गणली जाते. त्यांनी केश किंग, पेट सफा आणि डॉक्टर ऑर्थो सारखे अनेक प्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रँड तयार केले आहेत. त्यांच्या या व्यवसायामुळे हजारो जणांना रोजगार मिळतोय. 

व्यापारी संजीव जुनेजा यांचे वडील व्यवसायाने आयुर्वेद डॉक्टर होते. त्यांचे पंजाबमधील अंबाला येथे क्लिनिक होते. 1999 साली संजीव यांचे वडील देवाघरी गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. वडिलांकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी केला. वडिलांच्या जाण्याने संजीव खचून गेले नाहीत. त्यांनी अनेक आयुर्वेदिक उत्पादने बनवली.मागे वळून पाहिले नाही. आपल्या सातत्य आणि मेहनतीने त्यांनी जगभर प्रसिद्धी मिळवली.

2003 मध्ये संजीव यांनी रॉयल कॅप्सूलसह त्यांची यशस्वी आयुर्वेदिक उत्पादन लाइन सुरू केली. यातून जो काही फायदा झाला, तो त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी उपयोगी आला. 2008 मध्ये त्यांनी केश किंग हेअर ऑइल बाजारात आणले. हे उत्पादन केस गळणे आणि पांढरे केस येण्याच्या समस्येवरचा उपाय आगे. केश किंगला बाजाराने डोक्यावर उचलून घेतले. ग्राहकांकडून याची मागणी वाढत गेली. त्यामुळे अल्पावधितच हे आयुर्वेदिक उत्पादन बाजारात एक प्रसिद्ध ब्रँड बनले आहे.  सुरुवातीच्या काळात संजीव हे केश किंग तेल स्वत: घरोघरी जाऊन विकत असे.

केश किंगच्या यशामुळे ते टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये एक मोठा ब्रँड बनले. त्यावेळी केश किंगची उलाढाल केवळ 300 कोटींची होती. यानंतर बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनली.

Related posts