[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रात्री झोपण्यापूर्वी करतात हे काम
जया किशोरी यांना सकाळी स्वतःसाठी फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे रात्री स्वतःसाठी आवर्जून वेळ काढतात. मेडिटेशन हे उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात. जया किशोरी या रात्री न चुकता मेडिटेशन करतात. एवढंच नव्हे तर त्या पुस्तकांच वाचनही रात्री करतात. ज्यामुळे त्यांना त्यांचा असा स्वतःचा वेळ मिळतो. या दोन्ही गोष्टीमुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
हे व्हिडीओ आवर्जून पाहतात
रात्री झोपताना तुम्ही कोणता विचार घेऊन झोपता हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. चिंता,काळजी जे विचार केले तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पण जर तुम्ही हसणारे व्हिडीओ पाहिलात जर तुमचा मूडही चांगला राहतो आणि यामुळेच जया किशोरी रात्री झोपताना कॉमेडी व्हिडीओ पाहतात.
(वाचा – Vitamin D Rich Water :पाण्याच्या बॉटलमध्ये भरून ठेवा व्हिटॅमिन डी, हाडे होतील मजबूत आणि टणक)
मॉर्निंग रूटीन
जया किशोरी यांच्या दिवसाची सुरूवात ही नामस्मरणाने होते. ज्याचा सकारात्मक परिणाम दिवसभर पाहायला मिळतो. त्यानंतर जया किशोरी हे फळांचं सेवन करतात. यामुळे आरोग्य आणि त्वचा दोन्ही उत्तम राहण्यास मदत होते. तसेच दिवसभर पाण्याचे प्रमाणही योग्य असते.
(वाचा -१२० रुपये किलो असलेल्या टोमॅटोचे १० आरोग्यदायी फायदे, कॅन्सरपासून सांधेदुखीपर्यंत सगळेच आजार करेल छुमंतर)
१५ दिवसांत कमी केलं वजन
गेल्या काही दिवसांपासून जया किशोरी यांनी १५ दिवसांत वजन कमी केल्याची चर्चा आहे. जया किशोरी सांगतात मी माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी आग्रही नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण मला येत नाही. तसेच या दिवसांत हेल्दी जेवणासोबतच जंक फूड वर्ज केलं. ज्यामुळे त्यांना १५ दिवसांतच खूप चांगला रिझल्ट आला.
(वाचा – Pregnant Man : नागपुरातील पुरूष ३६ वर्षांपासून गरोदर, पोटात होती जुळी मुले, हे असं का होतं?)
काचेसारख्या त्वचेच रहस्य
जया किशोरी या प्रेरणादायी वक्त्या तर आहेतच पण सोबतच त्यांच्या सौंदर्याने देखील त्या आकर्षित करतात. जया किशोरी यांच्या काचेसारख्या त्वचे करता तुम्ही देखील सात्विक आहाराचं सेवन करू शकतात. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर योग्य प्रमाणात योगा आणि भरपूर पाणी हे जया किशोरी यांच्या ग्लोइंग त्वचेच रहस्य आहे.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]