नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं एक रहस्यच सध्या सर्वांसमोर आलं आहे. सध्या (Internet) इंटरनेटवर हाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो वारंवार पाहिला जातोय. काय म्हणता, तुम्ही नाही पाहिलाय हा व्हिडीओ? 

जाणून आश्चर्य वाटेल, पण हा एका नदीच्या जन्माचा, तिच्या उगमस्थानाचा व्हिडीओ (Video) असल्याचं म्हटलं जात आहे. तुम्ही कधी एखादी नदी आकारास येताना, उगम पावताना पाहिलीये का? फार क्वचित प्रसंगी असं एखादं दृश्य पाहण्याची संधी आपल्याला मिळते. हेच अद्वितीय दृश्य आपल्या समोर आणलंय (IFS Officer) आयएफएस अधिकारी अर्थात वनअधिकारी परवीन कस्वां यांनी. (trending news IFS Officer Shares Video Of how River flows)

कस्वां यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी जंगलाच्या कुशीत दडलेल्या एका नदीच्या प्रवाहाचा जन्म नेमका होतो तरी कसा, याबाबतची माहिती दृश्यांसहित दिली आहे. ओबडधोबड भूभागावरूनही आपली वाट काढत पाण्याचा प्रवाह नेमका कोणत्या दिशेनं आणि कसा जातो हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पाण्याचा वेग आणि त्यामुळं व्यापणारं क्षेत्र पाहता जेव्हा नदी वाहते तेव्हा तिच्या पात्रातील पाण्याचा वेग नेमका किती असेल याचा अंदाज लावता येत आहे. 

स्वत:चा मार्ग आखत प्रवाहित होणारी नदी… 

नद्यांचा ठराविक असा मार्ग नसतो. किंबहुना ती ज्या मार्गानं वाहत जाते तोच तिचा प्रवाहमार्ग ठरतो. बऱ्याचदा नदी जेव्हा पूर्ण ताकदीनं वाहते तेव्हा तिच्या प्रवाहात इतकी ताकद असते की आजुबाजूचा विस्तीर्ण परिसरही बऱ्याचदा तिच्या पात्राला लहान पडतो. कस्वां यांनी शेअर केलेल्या अवघ्या काही मिनिटांच्या व्हिडीओतून नदीच्या पात्राची ही वैशिष्ट्य सहजपणे लक्षात येत आहेत. 

परवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वनामध्ये निरीक्षण फेरीसाठी गेलं असतं त्यांच्या टीमला हे अद्वितीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली. काही क्षण वारंवार पाहायला मिळत नाहीत. एका नदीच्या जन्माची ही गोष्ट त्यातलीच एक असावी. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या त्या प्रवाहातील पाण्याच्या वेगानं अनेकांपर्यंत पोहोचत असून, त्यावर प्रत्येकजण भारावल्याचीच प्रतिक्रिया देत आहे. 

Related posts