[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
वजन कमी करण्यासाठी
काळ्या हळदीमध्ये फायबर पुरेसे असते. आहारात याचा समावेश केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले क्युरक्यूमिन हे अँटी-इंफ्लेमेटरी म्हणून काम करते. तसेच जळजळ कमी होण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळी हळद वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये आढळणाऱ्या कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म तसेच इन्सुलिन सुधारण्याची क्षमता असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य होते.
(वाचा – आपलं वय कमी करायला निघालाय हा करोडपती, तरूण दिसण्यासाठी खातो हे पदार्थ )
मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते
काळी हळद मेंदूच्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे फायदे देते. हे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकते. मायग्रेशनपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या हळदीचा वापर करू शकतात. काळ्या हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनमध्ये अवसादविरोधी गुणधर्म असतात, जे नैराश्य आणि चिंताची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
(वाचा – Sagging Breastवर उपाय म्हणून अंडरवायर ब्रा वापरताय, शरीरावर होतोय घातक परिणाम?)
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काळी हळद
जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर काळ्या हळदीचा आहारात नक्की समावेश करा. हे रक्तदाब सामान्य करण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या कर्क्यूमिनमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रक्त प्रवाह निरोगी ठेवण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.
(वाचा – Teeth Whitening : औषधं, टूथपेस्ट सोडा..4 फळांनी दातांवरचा पिवळा थर आणि काळ्या हिरड्या स्वच्छ करा, नैसर्गिक उपाय)
संधिवात साठी काळी हळद
काळ्या हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संधिवात असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. हे सांधे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
वाढत्या वयाबरोबर सांधेदुखीची समस्या डोकं वर करू लागते. काळ्या हळदीत असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी सांधेदुखीवर आराम मिळतो.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]