Jogging Benefits,Jogging केल्यानंतर त्वरीत करा ही ५ कामं, वजन झरझर कमी होण्यास मिळेल फायदा – things to do after jogging may support weight loss and health

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

काही वेळ शांत बसा

काही वेळ शांत बसा

Cool Down After Jogging: जॉगिंग करून जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा एका जागी शांत बसावे. यादरम्यान काहीही करू नये. लक्षात ठेवा की कोणत्याही व्यायामानंतर शरीर हे अत्यंत उष्ण होते आणि रक्तप्रवाह वाढलेला असतो यामुळे श्वसनप्रक्रियादेखील वाढलेली असते.

तुम्ही धावल्यानंतर त्वरीत काही काम करायला जाल तर उत्साही राहण्याऐवजी अधिक थकवा येतो. जॉगिंग केल्यावर शांत बसून स्वतःचे शरीर कूलडाऊन करा. तसंच Jogging करताना शेवटची काही मिनिट्स गती कमी करावी.

स्ट्रेचिंग करावे

स्ट्रेचिंग करावे

Do Stretching After Jogging: ज्याप्रमाणे तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म अप करता तसंच जॉगिंग केल्यानंतर तुम्ही मांसपेशी लवचिक बनविण्यासाठी स्ट्रेचिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.

धावल्यानंतर शरीर हे गरम असल्यामुळे मांसपेशी खेचल्या जाता. त्यामुळे तुम्ही धावल्यानंतर स्ट्रेचिंग केल्याने लवचिकता टिकून राहाते. तसंच स्ट्रेचिंग केल्याने मांसपेशीत होणारा त्रासदेखील कमी होतो. याशिवाय वर्कआऊट केल्याने तणाव कमी होतो आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत मिळते.

(वाचा – थुलथुलीत पोट-मांडीवरील चरबी गायब करण्यासाठी खा केवळ या भाजी, त्वरीत होईल वजन कमी)

पाणी प्यावे

पाणी प्यावे

Drink Water: जॉगिंग केल्यानंतर शरीरातून खूप घाम निघून जातो. तसंच शरीर घाम निघून गेल्याने डिहायड्रेट होते आणि शरीरातील पाणी कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला चक्कर येणे अथवा थकवा येणे याला सामोरेही जावे लागू शकते.

या सर्वांपासून वाचण्यासाठी तुम्ही शरीर थोडे कूलडाऊन झाल्यावर पाणी प्यावे. तसंच जॉगिंगनंतर शरीराला येणारा थकवा आणि घशाला पडलेली कोरड दूर करण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते. वर्कआऊटनंतर साधारण १ ग्लास पाणी प्यावे.

(वाचा – नसा सडवतील High Cholesterol, ५ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष येईल हार्ट अटॅक))

आंघोळ करावी

आंघोळ करावी

Take Shower After Jogging: जॉगिंगनंतर संपूर्ण शरीर घामाने भिजून जातं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होईपर्यंत शांत बसावं आणि नंतर आंघोळ करून घामट कपडे बदलावे. तज्ज्ञानुसार, जॉगिंगनंतर थंड पाण्याने आंघोळ करणं हे अधिक लाभदायक ठरतं. वास्तविक जॉगिंगनंतर प्रचंड थकवा आल्यामुळे थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीर त्वरीत रिकव्हर होण्यास मदत मिळते.

(वाचा – २०६ हाडांंना मजूबती मिळण्यासाठी करा या धान्याचा नियमित वापर, रक्तदाब आणि डायबिटीसही येईल नियंत्रणात)

हेल्दी अन्न खावे

हेल्दी अन्न खावे

Eat Healthy Snacks After Jogging: वजन कमी करण्यासाठी जॉगिंग अथवा कोणताही अन्य व्यायाम करून झाल्यावर तळलेल्या, जंक फूड अथवा आईस्क्रिमसारख्या पदार्थांवर ताव न मारता हेल्दी नाश्ता करावा. जंक फूड अथवा तेलकट खाण्याने वजन कमी होणे शक्य नाही. त्यामुळे काकडी, स्मूदीज, फळं यावर अधिक भर द्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts