4100 कोटींची संपत्ती; 2300 कोटींचे समभाग कर्मचाऱ्याला दिले, दुष्काळात सर्वस्व गमावलं, अन् नंतर…; कहाणी एका उद्योजकाची

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अनेक तरुणांचं नोकरी न करता उद्योजक होण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करताना येणारे अडथळे, आव्हानं यांची त्यांना कल्पना नसते. काहीजण हा संघर्ष न झेपल्याने माघार घेतात. पण काहीजण मात्र इतकी उंच झेप घेतात की इतरांसाठी ते प्रेरणा ठरतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिलीप सूर्यवंशी. दिलीप सूर्यवंशी (Dilip Suryavanshi) यांनी तरुणपणीच आपण कधीही दुसऱ्याची चाकरी करणार नाही असा निर्णय घेतला होता. आज त्यांच्याकडे 4100 कोटींची संपत्ती आहे. पण त्यांचाही प्रवास फार सोपा नव्हता. जाणून घ्या त्यांची यशस्वी उद्योजक होण्याची कहाणी…

मध्य प्रदेशातील आधारित Dilip Buildcon ने आपल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक अहवाल जाहीर केले आहेत. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज असणाऱ्या या कंपनीने तीन महिन्यात तब्बल 2200 कोटींची विक्री केली आहे. त्यांचा निव्वळ नफा 12 कोटी 31 लाख रुपये आहे. काही महिन्यांपूर्वीच या कंपनीला मध्य प्रदेश सरकारकडून तब्बल 700 कोटींचा प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रोजेक्टअंतर्गत कंपनी पायाभूत सुविधा उभारणार आहे. दिलीप सूर्यवंशी (Dilip Suryavanshi) यांनी कंपनीची स्थापना केली होती. देवेंद्र जैन (Devendra Jain) त्यांचे पार्टनर असून त्यांचाही प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. याचं कारण ते सुरुवातीला एक कर्मचारी म्हणून कामाला लागले होते. आज त्यांची संपत्ती 2300 कोटी इतकी आहे. 

दिलीप सूर्यवंशी हे दिलीप बिल्डकॉन लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्याकडे एकूण 44 वर्षांचा अनुभव आहे. जबलपूर विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. 1987 मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. 2006 मध्ये तिला कायदेशीर मान्यता मिळाली. या कंपनीचं मूळ नाव दिलीप बिल्डर्स होतं.

ही कंपनी निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारते. कंपनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध आहे.

दिलीप सूर्यवंशी यांनी तरुणपणी आपण कधीच कोणाकडे चाकरी करायची नाही असं ठरवलं होतं. त्यांचे वडील पोलीस दलात कार्यरत होते. दिलीप सूर्यवंशी यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1979 मध्ये आपल्या भावाच्या सोयाबीन फॅक्टरीत काम सुरु केलं होतं. पण दुर्दैवाने दुष्काळामुळे त्यांना आपला हा व्यावसाय बंद करावा लागला होता. 

यानंतर दिलीप सूर्यवंशी यांनी 1995 मध्ये आपली बांधकाम कंपनी सुरु केली. 1995 मध्ये त्यांनी 21 वर्षीय इंजिनिअर देवेंद्र जैन या तरुणाला कामावर घेतलं. पण काही वर्षांनी त्यांना देवेंद्र जैन यांचं महत्त्व लक्षात आलं आणि त्यांनी त्याला 31 टक्के समभाग दिले. त्यांनी देवेंद्र जैन यांना आपलं पार्टनर करुन घेतलं. 

देवेंद्र जैन यांनी उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. दिलीप सूर्यवंशी आणि देवेंद्र जैन हे दोघेही सध्या करोडपती आहेत. Hurun list 2021 नुसार, देवेंद्र जैन यांची एकूण संपत्ती 2300 कोटी रुपये होती. तसंच दिलीप सूर्यवंशी यांची एकूण संपत्ती 4100 कोटी रुपये होती.

Related posts