Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How to watch live telecast Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चांद्रयान-3चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत.

चांद्रयान-3 चं लँडिंग कधी?

23 ऑगस्टला म्हणजे उद्या 18 वाजून 04 मिनिटांनी (6:04 PM) चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे चांद्रयान-3 या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट कव्हरेज 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5:27 वाजता सुरू होणार आहे.

कुठे पाहाल लाईव्ह टेलिकास्ट?

ISRO वेबसाइट, ISRO चे YouTube चॅनल, ISRO चे Facebook पेज आणि DD National TV चॅनल तसेच National Geographic TV चॅनल यासह विविध प्लॅटफॉर्मवर दर्शक सॉफ्ट लँडिंग लाईव्ह पाहू शकतात. डिस्ने+ हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग देखील होईल. त्यामुळे तुम्ही आरामात भारत इतिहास रचताना पाहू शकता.

ISRO Website वर जाण्यासाठी इथे क्लिक करा >

Facebook वर लाईव्ह पाहण्याठी इथे क्लिक करा >

YouTube वर लाईव्ह पाहण्याठी इथे क्लिक करा >

दरम्यान, अमेरिका, रशिया, चीननंतर भारत चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल यामुळे मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पाण्याचं नेमकं स्वरुप समजेल तसंच चंद्रावर माणूस पाठवण्याच्या अमेरिकेच्या मोहिमेला मदत होणार आहे. याआधी चीननं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आलं नाही. 

लँडिंग कसं होणार?

चांद्रयान-3 चा विक्रम लँडर 25 किमी उचावरुन चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला साधारणपणे ११ मिनिटे लागतील. सेन्सर्सकडून लेझरच्या किरणांद्वारे चंद्रावर उतरण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यात येईल. चंद्रावर सुरक्षित लँडिंग करण्यासाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद असणार आहे. 

Related posts