भारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या  स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे. 

एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम

चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्पेस मोहिमांकडे लागले आहे.  भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेने स्पेस सेक्टरमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली. अनेक देश इस्त्रोच्या मदतीने आपल्या अंतराळ मोहिमा राबत आहेत. अनेक देशांचे रॉकेट इस्रोच्या मदतीने लाँच करण्यात आले आहेत.  एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. इस्रोमुळे हे शक्य झाले आहे. इतकेच नाही तर इस्रोने त्याच रॉकेटच्या मदतीने ते उपग्रह त्यांच्या वेगवेगळ्या कक्षेत देखील पाठवले आहेत.

भारताच्या आंतराळ मोहिमांकडे संपूर्ण जगाचे लक्ष

भारताच्या आंतराळ मोहिमांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. गगनयान, गगनयान 2, एक्सपोसॅट, निसार आणि मंगळयान 2 या पाच मोहिमा भारताच्या स्पेस इकॉनॉमीसाठी गेम चेंजर ठरणार आहेत. कारण, या पाच मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी  अवलंबून आहे. 

गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण येत्या 21 ऑक्टोबरला

चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर आता इस्रोनं आणखी एक नवी भरारी घेण्याचा मुहूर्त निश्चित केलाय… गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण येत्या 21 ऑक्टोबरला होणार आहे. एलव्हीएम 3 या रॉकेटच्या मदतीनं गगनयान मोहीम राबवली जाणाराय, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. 21 ऑक्टोबरला गगनयान मॉड्युल अंतराळात लाँच केलं जाईल. ते आऊटर स्पेसपर्यंत पाठवण्यात येईल. त्यानंतर ते पुन्हा जमिनवर परतेल. बंगलाच्या खाडीत त्याच्या रिकव्हरीसाठी इस्रो भारतीय नौदलाची मदत घेतली जाणार आहे.

गगनयान 2

गगनयान 2 मोहिमेअंतर्गत प्रत्यक्षात आंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत प्रथमच मानवाला अंतराळात पाठवणार आहे.

निसार मोहिम

निसार मोहिम हे  हे इस्रो आणि नासा यांचे संयुक्त मिशन आहे. या मिशनच्या मदतीने दोन्ही देश रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान सुलभ करण्यासाठी काम करणार आहेत.  यामुळे रडार इमेजिंग सुधारणार आहे.

मंगळयान 2

मंगळयान 2 हे  इस्रोच्या नियोजित मोहिमांपैकी एक आहे. मात्र, अद्याप ISRO ने याच्या टाइमलाइनबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही.

एक्सपोसॅट

एक्सपोसॅट हे भारताचे पहिले ध्रुवीय मिशन आहे.  क्ष-किरणांच्या स्त्रोताच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवले जाणार आहे. कृष्णविवरांच्या अभ्यासात याचा फायदा होणार आहे. 50 हून अधिक वैश्विक तेजस्वी स्रोतांचा अभ्यास या मिशन अंतर्गत केला जाणार आहे.

 

Related posts