( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bank Deposit Scheme In Marathi: बँकेच्या अफडी आणि आरडीअंतर्गंत केलेली गुंतवणुक आजही फायदेशीर ठरते. देशातील लाखो ग्राहकांचा कल आजही बँकेतील गुंतवणुकींकडे आहे. दर बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या एफडी आणि आरडीच्या योजना आणत असताता. इंडियन आणि आयडीबी बँकेने जास्त व्याजदर असलेल्या विशेष मुदत ठेव योजना (FD Scheme) आणल्या आहेत. मात्र, ही योजना ऑक्टोबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं अधिक गुंतवणुक देणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणुक करण्यास तुमच्याकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत.
डियन बँकेची स्पेशल डिपॉझिट Ind Super 400 दिवसांची मुदत आणि Ind Super 300 दिवसांची FD 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. त्याचप्रमाणे, IDBI बँकेचा विशेष FD अमृत महोत्सव 375 दिवसांचा आणि 444 दिवसांचा कालावधी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंतच आहे. दोन्ही बँका या FD योजनांवर गुंतवणूकदारांना जास्त व्याजदर देत आहेत.
इंडियन बँक स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीम
Ind Super 400 दिवसांची मुदत ठेव योजना
इंडियन बँकेच्या या एफडीमध्ये तुम्ही 10,000 ते रु. 2 कोटींपेक्षा कमी 400 दिवसांसाठी गुंतवणूक करु शकता. त्यावर सर्वाधिक व्याजदर तुम्हाला मिळतोय. डियन बँक या योजनेवर सर्वसामान्यांना 7.25% व्याजदराचा लाभ देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर आणि वरिष्ठ नागरिकांना 8.00% व्याजदर दिला जात आहे.
इंड सुपर 300 दिवसांची मुदत ठेव योजना
इंडियन बँकेच्या या दुसऱ्या एफडीचा पर्यायही तुम्ही वापरु शकता. IND SUPREME 300 DAYS जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली होती. 300 दिवसांसाठी तुम्ही 5000 ते 2 कोटीपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला आकर्षक व्याजदर मिळते.
IDBI बँक विशेष FD
आयडीबीआय बँकेच्या मते, अमृत महोत्सव स्पेशल एफडीची वैधता ३१ ऑक्टोबर रोजी संपत आहे. ही FD योजना 375 दिवसांची मुदत आणि 444 दिवसांच्या मुदतीवर गुंतवणूक करण्याची संधी देते. अमृत महोत्सव एफडी ज्येष्ठ गुंतवणूकदारांना ३७५ दिवसांच्या कालावधीवर ७.६५% व्याज मिळतेय. नियमित, NRE आणि NRO ग्राहकांना बँक 375 दिवसांच्या अमृत महोत्सव FD योजनेअंतर्गत 7.10% व्याज दर देते. या एफडी योजनेच्या गुंतवणूकदारांना मुदतपूर्व पैसे काढण्याची आणि बंद करण्याच्या सुविधेचाही लाभ मिळतो.
इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकेच्या अन्य एफडीचे व्याजदर
इंडियन बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.80% ते 6.70% दरम्यान व्याजदर देते.
IDBI बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD साठी 3% ते 6.80% पर्यंत व्याजदर देते.
दोन्ही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदराचा लाभ दिला जातो.