२ वर्षांपूर्वी झाला होता एन्काउंटर, आता कबरीतून मृतदेह गायब, सत्य कळताच पोलिस हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Girl Dug Grave: पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या एका गुन्हेगाराची दोन दिवसांनी कबर खोदण्यात आली. मात्र, कबर खोदल्यानंतर आतमध्ये त्याचा मृतदेहच गायब असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तपास करण्यात आल्यानंतर भयंकर सत्य समोर आलं आहे. 

मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार 

डेली स्टार रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, लाजोरा बारबोसा डी सूसा (Lázaro Barbosa de Sousa) नावाचा व्यक्ती हा शहरातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होता. त्याच्यावर बलात्कार, मारहाण, अपरहण, हत्या सारखे डझनभर गुन्ह्यांची नोंद होती. ९ जून २०२१मध्ये सीलँडियातील एकाच परिवारातील चार जणांची हत्या करुन फरार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका महिन्यानंतर एन्काउंटर करुन त्याला ठार केले. 

दोन वर्षांनी समोर आला प्रकार

गुन्हेगाराच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षांनंतर आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण दोन वर्षांनंतर त्याला दफन करण्यात आलेली कबर खोदण्यात आली. एका १५ वर्षांच्या मुलीने त्याची कबर खोदून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. लोकांना याबाबत कळताच एकच खळबळ माजली आहे. 

तरुणीवर चाकुने ४० वार, नंतर दगडाने ठेचून ठार केले, दिल्लीत भररस्त्यात थरार 

तरुणीने केला हैराण करणारा खुलासा

पोलिसांनी याप्रकरणी केलेला खुलासा आश्चर्यचकित करणारा आहे. पोलिसांनी सांगितले की, एका १५ वर्षांच्या मुलीने तिच्या मैत्रिणीसोबत मिळून कबर खोदली आहे. चौकशीत तिने म्हटलं आहे की, बारबोसा तिच्या स्वप्नात आला होता व तिच्याकडे मदतीची भीक मागत होता. तो जिवंत असून त्याला इथून बाहेर काढण्यात यावे, असं त्याने स्वप्नात म्हटल्याचे मुलीने सांगितले आहे. त्यानंतर त्यांने २१ वर्षीय मैत्रिणीसोबत मिळून कबर खोदून मृतदेह बाहेर काढला. 

सीसीटीव्ही फुटेजसमोर

पोलिस अधिकारी राफेल नेरिस यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कबर खोदणारी ती मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळं तिच्या नावचा खुलासा करता येणार नाही. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तेव्हा तिने स्वप्न बघितल्यानंतर कबर खोदल्याचे कबुल केले आहे. 

पोलिसांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगाराचा मृतदेह दफन केला आहे. पोलिस आरोपी मुलीच्या पालकांच्या संपर्कात आहेत. 

पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या

दिल्लीत थरारक घटना

दरम्यान, दिल्लीत एक थरारक घटना घडली आहे. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल ४० वेळा चाकूने वार करत चार वेळा तिच्या डोक्यात दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Related posts