260 हून अधिकांचा जीव घेणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघातचे खरं कारण समोर; अहवालातून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha train crash : ओडिशातील (Odisha train accident) बालासोर येथे शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झालाय. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. रेल्वेमंत्र्यांसह सर्व प्रमुख लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. तीन गाड्यांच्या धडकेने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य कारणांमुळे हे स्पष्ट झालेले नव्हते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल. याशिवाय रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वतंत्र चौकशी करणार आहेत. 

या सगळ्यात सातत्याने एकच प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे एकाच वेळी तिन्ही गाड्यांचा अपघात कसा झाला? दुसरीकडे मात्र, एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने अपघातामागे सिग्नलिंगमध्ये तांत्रिक बिघाड आणि मानवी चूक (human error) असल्याची  भीती व्यक्त केली आहे. संयुक्त अहवालानुसारही या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड असल्याचेच म्हटलं आहे. ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्राथमिक अहवालात यामध्ये मानवी चुका असल्याचे समोर येत आहेत. रेल्वेच्या सिग्नलिंग कंट्रोल रूममधून हा अहवाल आला आहे. या घटनेपूर्वी ट्रेन चुकीच्या ट्रॅकवर गेल्यानंतरच हा अपघात झाल्याचे अहवालात म्हटलं आहे.

नेमकं काय झालं?

माध्यमांच्या वृत्तानुसार, मालगाडी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. दुसरी ट्रेन पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून पास करावी लागते तेव्हा ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते. बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी, मालगाडी लूप लाइनवर उभी करण्यात आली होती. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती.

जवळपास कोणताही थांबा नसल्याने दोन्ही गाड्या वेगात होत्या. त्याचवेळी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसलाही धडकले. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे दोन डबेही रुळावरून घसरले होते. तरे कोरोमंडल एक्स्प्रेसचे 21 डबे रुळावरून घसरले आणि तीन डबे डाऊन लाईनवर फेकले गेले. 

चुकीच्या ट्रॅकवर ट्रेन गेली अन्…

सिग्नलिंग कंट्रोल रूमच्या अहवालानुसार, अपघातापूर्वी कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन चुकीच्या मार्गावर गेली होती. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या खरगपूर विभागाच्या सिग्नलिंग कंट्रोल रूममधून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी बहानगर बाजार स्थानकाजवळ लूप लाईन घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे जिथे मालगाडी उभी होती. त्यानंतर 127 किमी प्रतितास वेगाने धावणारी कोरोमंडल एक्सप्रेस एका मालगाडीला धडकली आणि मुख्य मार्गावर रुळावरून घसरली. काही मिनिटांतच विरुद्ध दिशेने येणारी हावडाकडे जाणारी यशवंतनगर एक्सप्रेस रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली.

Related posts