आंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृ्त्तानुसार एका अधिकाऱ्याने, ‘ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडून गेला. त्यामुळे ट्रेनने दुसऱ्या…

Read More

कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

Read More

Mathura train accident drunk railway worker on mobile Phone Insight CCTV Footage;मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइट CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…

Read More

लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचं CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) काझीगुंड (Qazigund) येथे शुक्रवारी व्हॅनला ट्रकची धडक बसल्याने मोठा अपघात घडलाय. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात व्हॅनने लेन बदलण्याचा प्रयत्न केला असताना हा अपघात झाला आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह (JK Police) स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. एका कुटुंबातील सदस्यांना…

Read More

260 हून अधिकांचा जीव घेणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघातचे खरं कारण समोर; अहवालातून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha train crash : ओडिशातील (Odisha train accident) बालासोर येथे शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झालाय. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. रेल्वेमंत्र्यांसह सर्व प्रमुख लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. तीन गाड्यांच्या धडकेने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य कारणांमुळे हे स्पष्ट झालेले नव्हते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल. याशिवाय रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वतंत्र चौकशी करणार आहेत.  या सगळ्यात सातत्याने एकच प्रश्न…

Read More

भीषण! एकाच ठिकाणी धडकल्या तीन रेल्वेगाड्या; ओडिशातील भयाण अपघाताचं खरं कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशातल्या (Odisha) रेल्वे अपघाताने सगळ्या देशाला हारवलं आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 280 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असली तरी मृतांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. शुक्रवारी संध्याकाळी मालगाडी आणि दोन प्रवासी गाड्यांमध्ये झालेल्या या अपघातांमुळे मृत्यू तांडव पाहायला मिळालं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnaw) यांनीही घटनास्थळी पोहोचत अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ओडिशा रेल्वे अपघाताच्या भीषण दृश्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अपघातातील मृतांचा आकडा…

Read More