Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tiger Viral Video : दिवाळी सुट्ट्यानंतर आता Christmas Vacation 2023 सुरु होणार आहे. अशात अनेकांना जंगल सफारीला जायला आवडतं. ताडोबा, पेंचसह भारतातील अनेक जंगल सफारीमध्ये वाघाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक जातात. भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या वेगवेगळ्या झोनला वाघ बघिण्यासाठी वारंवार अनेक जण जात असतात. अनेकांना वाघाची पर्वणी पाहणं भाग्यच असतं. तर काही लोकांना फक्त वाघाच्या पंजाच्या खुणा दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (trending video While walking along the road suddenly a tiger came in front and then Tiger Viral Video )

डरकाळ्याने हादरतात!

खरं जंगली प्राण्याचं नाव घेतली तरी आपल्याला घाम फुटतो. सिंह, वाघ, साप पाहून आपण थरथरतो. वाघाची डरकाळी ऐकून आपल्या जीव निघतो. अशातच एक व्यक्ती नेहमी प्रमाणे कामासाठी रस्त्यावरून मजेत जात होता. त्याच्या ध्यानी मनी नसताना अचानक त्याच्यासमोर वाघ येतो. तो वाघाला पाहून घाबरतो आणि उलट्या दिशेने वळतो. त्याचं नशीब बलवत्त म्हणून तो वाघ त्याला काही न करता तिथून निघून जातो. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की, हा वाघच बिथरलेला आहे. त्याला त्या भागातून लगेचच निघून सुरक्षित ठिकाणी जायचं आहे.

41 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. शक्तिशाली वाघ पाहून रस्त्याच्या पलीकडे तो माणून पळू लागतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्या व्यक्तीला भाग्यशाली ठरवत आहेत.

हा धक्कादायक व्हिडीओ  ‘भारतीय वन सेवा अधिकारी’ (IFS) परवीन कासवान (@ParveenKaswan) यांनी 8 डिसेंबरला X वर शेअर केला होता. हा व्हिडीओला शेअर करताना लिहिलं आहे की,  हा सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे का? असं वाटतं वाघाला त्या माणसामुळे काही फरक पडला नाही. कॉर्बेटकडून.

या व्हिडीओला आतापर्यंत 54 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर या व्हिडीओला अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय की – सर, उत्तराखंडच्या लोकांसाठी ही सामान्य गोष्ट आहे. तर दुसऱ्यानं सांगितलं की ही त्या व्यक्तीवर देवीची कृपा आहे. तर काही यूजर्सने मजेशीर कमेंट केल्या आहेत, एकाने म्हटलं आहे की, टायगर उपोषणावर होता.

 

Related posts