Climbing Stairs Benefits For Health Reduce Belly Fat; जिने चढण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून पोटाची चरबी कमी करण्यापर्यंत उत्तम पर्याय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोटाची चरबी गाळून वजन होते नियंत्रित

पोटाची चरबी गाळून वजन होते नियंत्रित

सध्या सर्वात मोठा त्रास म्हणजे वजन वाढणे आणि ते कमी करताना आणि पोटाची वाढलेली चरबी कमी करताना अत्यंत मेहनत करावी लागते. मात्र वजन वाढल्याची समस्या कमी करण्यासाठी जिने चढल्याचा फायदा करून घेता येतो.

NCBI च्या शोधानुसार जिने चढण्याचा उपयोग हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी करण्यासाठी होतो. वजन वाढण्यासाठीचा हे कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या ट्रेनरच्या मदतीने किती जिने चढायचे हे ठरवून रोज हा व्यायाम करावा.

कोलेस्ट्रॉल होते कमी

कोलेस्ट्रॉल होते कमी

​कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जिने चढल्याच्या व्यायामामुळे ट्रायग्लिसराईड्सचा उच्च स्तर कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये LDL कोलेस्ट्रॉल अर्थात चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्याची क्षमता असते. ट्रायग्लिसराईड्स रक्तामध्ये आढळणारे एक प्रकारचे फॅट आहे. त्यामुळे जिने चढण्याचा व्यायाम नियमित करण्याचा सल्ला दिला जातो.

याशिवाय एका शोधामध्ये सांगण्यात आले आहे की, रोज जिने चढल्यामुळे कमी घनता असणारे लिपोप्रटीन कोलेस्ट्रॉल अर्थात हानिकारक कोलेस्ट्रॉल साधारणतः ७.७ टक्के कमी करता येऊ शकते.

अनिद्रेची समस्या होते कमी

अनिद्रेची समस्या होते कमी

झोप न येणे अर्थात अपुऱ्या झोपेची ही समस्याही दिवसेंदिवस वाढीला लागली आहे. एका रिसर्च अनुसार कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे शरीराचे तापमान वाढते आणि शरीर थकते. त्यामुळे जिने चढल्याचा शारीरिक व्यायाम करून तुम्हाला अधिक चांगली झोप लागते आणि अनिद्रेसारख्या समस्याही दूर होतात.

हाडे होतात मजबूत

हाडे होतात मजबूत

हाडे कमकुवत झाली असतील तर तुम्ही रोज जिने चढण्याचा व्यायाम करावा. रिसर्चनुसार, हाडांची मजबूती वाढविण्यासाठी Weight Bearing Exercise मध्येही जिने चढण्याचा व्यायाम समाविष्ट आहे. या व्यायामामुळे मिनरल डेन्सिटी अर्थात हाडांचे घनत्व वाढते आणि मजबूती मिळते. त्यामुळे जिने चढण्याचा व्यायाम उत्तम ठरतो असे डॉक्टर सांगतात.

रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासाठी

रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासाठी

रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रित करण्यासाठी जिन्यावर चढण्याचे फायदे मिळतात. यामध्ये करण्यात आलेल्या शोधानुसार, हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबग्रस्त पोस्टमेनोपॉजल महिलांना १२ आठवड्यांकरिता व्यायाम म्हणून जिने चढायला सांगण्यात आले. यानंतर करण्यात आलेल्या अहवालानुसार त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झालेली दिसून आली होती.

[ad_2]

Related posts