Mallikarjun Kharge has targeted the PM Narendra PM Modi Lakshdweep Photo;’लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?’ खरगेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप येथील फोटोंवर टीका केली. लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष हिंसाचार सुरु असताना मणिपूरला का गेले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

14 जानेवारीपासून सुरू होणारी ही भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होणार असून ती 15 राज्यांतून जाणार आहे. यावेळी खर्गे यांच्या हस्ते भारत जोडो न्याय यात्रेच्या लोगो आणि घोषवाक्याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच भारत जोडो यात्रेची त्यांनी यावेळी दिली.  इंडिया अलायन्सच्या सर्व मित्रपक्षांनाही सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. ते शक्य असेल तेथे सहभागी होतील, असे यावेळी खर्गे म्हणाले. 

भारत जोडो न्याय यात्रा असे या प्रवासाचे नाव असून या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी करणार आहेत. ही यात्रा देशातील एकूण 15 राज्यांमधून जाणार आहे. या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसची टीम 6700 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहे. सर्वात लांबचा प्रवास उत्तर प्रदेशचा असेल. येथे राहुल गांधी 1074 किलोमीटरचा प्रवास करतील. या कालावधीत ते 11 दिवसांत राज्यातील 20 जिल्हातून प्रवास करतील अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

भारत जोडो न्याय यात्रेचे संपूर्ण वेळापत्रक

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता इंफाळ, मणिपूर येथून सुरू होईल. मणिपूरनंतर ते नागालँडमार्गे मेघालय, त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश आणि परत आसाममध्ये प्रवेश करणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा नंतर बंगाल आणि नंतर बिहार, झारखंड, ओडिशा आणि नंतर उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात जाईल. या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाने भारत आघाडीतील सर्व पक्षांना निमंत्रित केल्याची माहिती खर्गे यांनी दिलीय 

कुठे आणि किती दिवसांचा प्रवास?

-5 दिवस आणि बंगालमधील 7 जिल्हे.
-4 दिवस आणि बिहारमधील 7 जिल्हे.
-8 दिवस आणि झारखंडमधील 13 जिल्हे.
-536 किमी, 5 दिवस आणि छत्तीसगडमधील 7 जिल्हे.
उत्तर प्रदेशात -1074 किमी, 11 दिवस आणि 20 जिल्हे 
-128 किमी, 1 दिवस आणि राजस्थानमधील 2 जिल्हे

Related posts