पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक भाषण अन् सरकारी कंपन्यांच्या शेअरधारकांनी कमावले 24 लाख कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Rajya Sabha Speech : मोदी की गारंटी असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी की गारंटी शेअर मार्केटमध्ये खरी ठरताना दिस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक करणारे गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवुक करणाऱ्या गुंतवणुकदारांनी 24 लाख कोटींची कमाई केली आहे. 

10 ऑगस्ट 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत 2 तास 13 मिनीट भाषण केले. पंतप्रधान मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर  अवघ्या सहा महिन्यात कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांनी मोठा नफा कमवला आहे. 

भाषणात काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी

संसदेतील  2 तास 13 मिनीटांच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला होता. विशेषत: ज्या सरकारी कंपन्यांच्या कारभाराबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते त्याच कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणुक करा निश्चित मोठा नफा मिळेल  असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. अनेकांनी सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक केली. सहा महिन्यात त्यांना याचा रिझल्ट मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवुक करणाऱ्या गुंतवणुकदारांना 24 लाख कोटींची नफा झाला आहे. 

LIC चे शेअर वधारले

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात LIC आणि HAL या दोन सरकारी कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला होता. या दोन्ही कंपन्या देशातील सर्वात मोठ्या सरकारी कंपन्या आहेत. 6 महिन्यांपूर्वी  LIC च्या शेअरची किंमत फक्त 655 रुपये होती. आता मात्र, LIC च्या शेअरचा रेट 1029 रुपयांवर पोहोचला आहे.  म्हणजेच 6 महिन्यांत गुंतवणुकदारांना तब्बल 57 टक्के परतावा मिळाला आहे.

HAL चे शेअर खरेदी करणारे झाले मालामाल

HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या आणखी एका सरकारी कंपनीचे नाव देखील पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात घेतले होते. सहा महिन्यांपूर्वी HAL कंपनीच्या शेअरचा भाव 1876 रुपयांच्या आसपास होता. आता याच्या शेअरचा रेट 2933 रुपयांवर गेला आहे. HAL कंपनीच्या गुंतवणूकदारांना एका शेअरमधून 1000 रुपयांपेक्षा जास्त नफा मिळाला आहे. या शेअरमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या 6 महिन्यांत  56.37 टक्क्यांचा मजबूत परतावा मिळाला आहे. 

सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांना 232 टक्क्यांचा मजबूत परतावा

एलआयसी आणि एचएएल या बड्या सरकारी कंपन्यांसह तब्बल  56 सरकारी कंपन्याचे शेअर तेजीत आले आहेत. सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये 6 महिन्यांत 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा महिन्यात  गुंतवणूकदारांनी या शेअर्समधून 23.7 लाख कोटींचा मोठा नफा कमावला आहे. एनबीसीसीसारख्या  शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. NBCC सारख्या शेअरर्सच्या  गुंतवणूकदारांना 232 टक्के मजबूत परतावा मिळाला आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत फक्त 48 रुपये होती. यात  IC, रेल विकास निगम, MMTC, NDMC, सेंट्रल बँक, UCO बँक, IRCON, NHPC या 56 कंपन्यांचा समावेश आहे.

Related posts