Budget 2024: टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र ‘त्या’ नोकरदारांना 7 लाखांपर्यंत Income Tax नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024 Tax Slab: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये नोकरदार वर्गाला मोठी भेट दिली आहे. नव्या करप्रणालीनुसार आयकर भरणाऱ्यांना 7 लाखांपर्यंत कोणताही आयकर देण्याची गरज नसल्याची तरतूद यापुढेही कायम राहणार असल्याची महत्त्वाची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली आहे. हा करदात्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या व्यक्तीरिक्त कररचनेमध्ये म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  कोणताही बदल नाही निवडणुकीआधी करदात्यांना मोठा दिलासा दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नवीन करप्रणालीनुसार कर भरणाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आलेला…

Read More

पाइपातून ऑक्सिजन अन् जेवण…; 24 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे, 40 मजूरांना वाचवण्यासाठी जीवाचे रान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्याचा भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जवळपास 40 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्याचे जिन्नसही त्यांच्यामार्फत पोहोचवले जात आहेत.  बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याचा जवळपास 30 ते 35 मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. रविवारी सकाळी 5.30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतमध्ये 40 ते 45 जण फसले आहेत. सर्व मजुर सुरक्षित आहेत, अशी माहिती लोडर…

Read More

जैसे ज्याचे कर्म! चोरी करुन पळून जाताना 11 हजार व्होल्टच्या तारेला चिकटला, रस्त्यावर तडफडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या कर्माचं फळ ईश्वर याच जन्मात आपल्याला देतो असं म्हणतात. दिल्लीतील गाजियाबाद येथील एका घटनेनंतर याची प्रचिती आली आहे. याचं कारण चोरी करुन पळून जाणाऱ्या एका चोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चोरी केल्यानंतर चोर छतावरुन पळून जात असताना वीजेच्या तारेच्या संपर्कात आला आहे. वीजेचा धक्का इतका जबरदस्त होती की, त्याचा तिथेच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याजवळचं चोरीचं सर्व सामान जप्त केलं आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रातून त्याची ओळख पटली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरगड…

Read More