विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? वैमानिकाने शेअर केला कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमानातून प्रवास करताना खिडकीच्या शेजारची सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचं कारण खिडकीतून दिसणारं मनमोहक दृश्य पाहण्याचा मोह आवरत नसतो. आपण कितीही मोठे झालो तरी ही एक गोष्ट मात्र आपल्याला बालपणात घेऊन जाते. अनेकदा आपल्याला हे दृश्य पाहिल्यानंतर कॉकपिटमधून किती सुंदर दिसत असेल असंही वाटतं. पण प्रवाशांना तिथे प्रवेश निषिद्ध असल्याने आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.  Newsweek त्या वृत्तानुसार हा व्हिडीओ टर्कीमधला आहे. वैमानिक Bedrettin Sagdic याने हा…

Read More

13 वर्षांची मुलगी जाताना बाहुली पण घेऊन गेली! फासावर दोघींना पाहून पोलिसही गहिवरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवारी ही घटना घडली असून कोलकत्ता येथील ही तरुणी आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृतदेहाशेजारीच तिची बाहुलीलाही गळफास लावलेल्या स्थितीत होती. ही बाहुली सतत तिच्यासोबत असायची तीदेखील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.  13 वर्षांच्या चिमुकलीने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन बाहुल्यांच्या भोवती गळफास तयार करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला असून फक्त एकाच बाहुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता.…

Read More

जैसे ज्याचे कर्म! चोरी करुन पळून जाताना 11 हजार व्होल्टच्या तारेला चिकटला, रस्त्यावर तडफडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या कर्माचं फळ ईश्वर याच जन्मात आपल्याला देतो असं म्हणतात. दिल्लीतील गाजियाबाद येथील एका घटनेनंतर याची प्रचिती आली आहे. याचं कारण चोरी करुन पळून जाणाऱ्या एका चोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चोरी केल्यानंतर चोर छतावरुन पळून जात असताना वीजेच्या तारेच्या संपर्कात आला आहे. वीजेचा धक्का इतका जबरदस्त होती की, त्याचा तिथेच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याजवळचं चोरीचं सर्व सामान जप्त केलं आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रातून त्याची ओळख पटली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरगड…

Read More

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; बोलेरो दरीत कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Accident : उत्तराखंडच्या पिथौरागढ (Pithoragarh Accident) येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे (Uttarakhand Police) पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बागेश्वरच्या शमा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.  प्रवाशांनी भरलेली…

Read More