मुस्लीम देशात रस्ता बांधण्यासाठी पाडण्यात आली 300 वर्षं जुनी मशीद, एकच गदारोळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य-पूर्व भागातील इस्लामिक देश इराकमध्ये 300 वर्षं जुनी मशीद आणि तिची मिनार पाडण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. इराकमधील अधिकाऱ्यांना बसरा शहरात एका महत्त्वाच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी मशीद उद्ध्वस्त केली. अबू-अल खासीबचं रुंदीकरण करण्यासाठी ऐतिहासिक अल-सिराजी मशीद आणि तिची मिनार पाडण्यात आल्याने स्थानिक नाराज झाले आहेत.  इराकच्या अधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे स्थानिक लोक फार नाराज आहेत. त्यांनी इराकच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली आहे.  1772 मध्ये बसरा शहरात अल-सिराजी मशीद उभारण्यात आली होती. ही मशीद इराकच्या प्रमुख ऐतिहासिक स्थलांमध्ये गणली जात होती. आपल्या…

Read More

Odisha Train Accident: बालासोरमध्ये मृतदेह ठेवलेली शाळा पाडण्यात आली, विद्यार्थ्यांनी असं काय केलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasore School Demolished: ओडिशामध्ये (Odisha) 2 जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेत 288 लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे. या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह बालासोरमधील (Balasore) एका शाळेत ठेवण्यात आले होते. शाळेला तात्पुरतं शवगृह केल्याने विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक नाराज आहेत. शाळेत मृतदेह ठेवण्यात आले होते या कारणाने विद्यार्थी तिथे जाण्यास घाबरत आहेत. यामुळे अखेर सरकारने ही शाळा पाडण्याचा निर्णय घेतला आहे.  ही शाळा बालासोर जिल्ह्याच्या बहनागा गावात आहे. शाळेचा वापर मृतदेह ठेवण्यासाठी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यास नकार दिला…

Read More