सरकारी नोकरी शोधताय? SSCची वेबसाइट बदलली, आता इथे मिळणार भरतीची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com)

SSC New Website: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. तर, तुम्ही केंद्र सरकारमध्ये नोकरीच्या संधी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत सरकारकडून विविध विभागातील भरतीसंदर्भात स्टाफ सिलेक्शन कमीशनवर अनेक अपडेट येत असतात. कर्मचारी निवड आयोगाने (स्टाफ सिलेक्शन आयोग) अलीकडेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटमध्ये बदल करण्यात आले आहे. आता वेबसाइटचा अॅड्रेस ssc.nic.in नसेल. आयोगाने एसएससी वेबसाइटच्या लाँचिगसंदर्भात एक नोटिसदेखील जारी केली आहे. 

स्टाफ सिलेक्शन कमीशनने वेबसाइटमध्ये बदल करुन नव्याने लाँच केली आहे. या वेबसाइटची नोटिस ssc.nic.in या त्यांच्या जुन्या वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे. म्हणजे जेणेकरुन सर्व उमेदवारांना याबदलाबाबत माहिती मिळेल. एसएससीच्या नव्या वेबसाइटचा अॅड्रेस आता ssc.gov.in असा आहे. त्याचबरोबर OTR संबंधातही अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

SSC OTR: वन टाइम रजिस्ट्रेशन कुठे करावे लागेल?

SSCने म्हटलं आहे की, नवी वेबसाइट तयार करण्यात आल्यानंतर उमेदवारांना आता पुन्हा एकदा  वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही जुन्या वेबसाइटवरही रजिस्ट्रेशन केले असेल तरीही एकदा पुन्हा तुम्हाला ओटीआर रजिस्ट्रेशन करावे लागेल. मात्र ही प्रोसेस तुम्हाला ssc.gov.in वर जावून पूर्ण करावी लागणार आहे. 

आगामी काळात येणाऱ्या सर्व एसएससी जागांच्या भरतीबाबात उमेदवारांना नव्या वेबसाइटवर माहिती मिळणार आहे. नव्या SSC Recruitments, जॉब नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या प्रोसेसदेखील ssc.gov.in वरुनच पूर्ण करावे लागणार आहे. जुन्या वेबसाइटवरुन नोकरीसाठी केले गेलेले अर्ज अमान्य करण्यात येणार आहेत. 

एसएससीच्या लेटेस्ट नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नव्या वेबसाइटवर 17 फेब्रुवारी 2024 रोजी लाइव्ह करण्यात आले आहे. मात्र, जुनी वेबसाइटही अद्याप अॅक्टिव्ह आहे. याची एक लिंक नव्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. मात्र भरतीसंदर्भातील सर्व गोष्टी व अपडेट नवीन साइटवरुनच करावे लागणार आहेत. 

सेंट्रल बँकेत भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (CBI) अप्रेंटिसशिपसाठी 3000 पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रेंटिसशिपपदासाठी अर्ज करताना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS)च्या अधिकृत वेबसाइटवर  nats.education.gov.in जाऊन अर्ज करु शकता. एकदा अर्ज केल्यानंतर एक परीक्षादेखील घेण्यात येईल. उमेदवारांना ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. या उमेदवारांसाठी 15,000 रुपये मासिक पगार मिळणार आहेत. तर, या उमेदवारांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी असणार आहे. अर्ज करण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2024 ते 06 मार्च 2024 पर्यंतच असणार आहे. 

Related posts