[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अंडे
Egg For Weight Loss: अंड्यामध्ये अनेक पोषक तत्व असल्याने योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने याचे सेवन केल्यास, वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. हाय प्रोटीन आणि कमी कॅलरी असल्यामुळे एग व्हाईट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
ग्रीन टी
Green Tea For Belly Fat Burn: ग्रीन टी च्या पानांमध्ये असलेले पॉलिफिनॉल हे अँटिऑक्सिडंटने युक्त असून इन्फ्लेमेशनशी लढा देण्यास उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासह हृदयाची काळजी घेण्यासाठीही याची मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी याचा दैनंदिन वापर केल्यास फायदा मिळतो.
(वाचा – प्रथिनांचा खजिना ठरतात कडधान्य आणि डाळी, ५ रेसिपी ज्या ठरतील आरोग्यासाठी लाभदायक)
आळशी
Flax Seed To Reduce Belly Fat: मेटाबॉलिक सिंड्रोम कमी करण्याची ताकद आळशीमध्ये असून शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून कमरेवरील आणि पोटावरील चरबी जाळण्यास मदत होईल. यामध्ये असणारे फायबर आणि ओमेगा – ३ फॅटी अॅसिड वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.
(वाचा – प्रोसेस्ड फूड ठरत आहेत अधिक धोकादायक, जाणून घ्या कारण)
पालक
Spinach For Weight Loss: लो कार्ब्स आणि लो कॅलरी असणारे पालक हे विटामिन्सने भरलेले आहे. पालेभाजी असून हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे. वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात पालक समाविष्ट करून घेणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. PubMed ने दिलेल्या अहवालानुसार, पालकामधील पौष्टिक तत्वांबाबत अधिक स्पष्टता मिळते.
(वाचा – किचनमधील छोट्याशा काळ्या पदार्थाचे पाणी पिऊन नसांमधील चिकट घाण येईल बाहेर, Bad Cholesterol वरील रामबाण उपाय)
सफरचंद
अगदी डॉक्टरही रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. हाय फायबर असणारे सफरचंद अन्नपचन करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच लवकर भूक लागत नाही आणि वजन वाढण्याची समस्याही निर्माण होत नाही. याशिवाय यात अत्यंत कमी साखरेचे प्रमाण असते. एका सफरचंदामध्ये ४.५ ग्रॅम फायबर आढळते. वजन कमी करण्यासाठी रोज सफरचंद खाणे अथवा त्याची स्मूदी पिणे उपयुक्त ठरू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा
[ad_2]