[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
काळी मिरीचा वजन कमी करण्यासाठी फायदा
काळ्या मिरीचा फायदा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. Science Direct ने केलेल्या अभ्यासानुसार, काळी मिरीचा खूपच फायदा होतो. याच्या मदतीने तुमचे मेटाबॉलिजम बुस्ट होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी घटविण्यासाठी हे फायदेशीर ठरते. काळ्या मिरीमध्ये असणारे पिपेरीन नावाचे यौगिक मेटाबॉलिजम बुस्ट करण्यासाठी मदत करते. हे शरीरातील चरबी साठवणे बंद करते. तसंच कोलेस्ट्रॉलदेखील बाहेर काढून टाकते.
कॅलरी जाळण्यास मदत
इतकंच नाही तर केलेल्या अभ्यासानुसार, कॅलरी जाळण्यासदेखील काळ्या मिरीचा फायदा होतो. काळी मिरी हा थर्मोजेनिक पदार्थ असून मेटाबॉलिजमची प्रक्रिया यामुळे त्वरीत घडते आणि कॅलरी त्वरीत जाळण्यास मदत होते. तुम्ही जर काळी मिरी हेल्दी पद्धतीने खाल्ली आणि आहारात योग्यरित्या समाविष्ट करून घेतली तरी पोटाची चरबी १ महिन्यात कमी होण्यास मदत मिळते.
(वाचा – अबू धाबीमध्ये सापडला कोरोनाचा नवा वेरिएंट MERs-CoV, काय आहेत लक्षणं जाणून घ्या)
दह्यासह काळी मिरी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दह्यासह थोडीशी काळी मिरी मिक्स करावी आणि नियमित खावे. यामध्ये कॅल्शियम असून तुमचे BMI स्तर नियंत्रणात आणण्यास याचा फायदा होतो. तसंच दही हे एक प्रोबायोटिक्स आहार असून पचनक्रिया दुरुस्तीसाठी याचा अधिक उपयोग होतो. तुमचे वजन लवकर कमी व्हावे असं वाटत असेल तर दह्यामध्ये नेहमी काळी मिरी मिक्स करून नेहमी खावे. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.
(वाचा – युरिक अॅसिडच्या रूग्णांसाठी ३ पदार्थ ठरतात विष, वेळीच व्हा दूर नाहीतर गमवाल जीव)
सलाडमध्ये काळी मिरी पावडर
वजन त्वरीत कमी करण्यासाठी रोज सलाडमध्ये काळी मिरी पावडर घालून खावे. वजन घटविण्याचा हा उत्तम पर्याय आहे. यासाठी काकडी, टॉमेटो, गाजर तुकडे करून लिंबू पिळा आणि त्यावर थोडेसे मीठ आणि काळी मिरी पावडर घालून नियमित खावे. काही दिवसातच तुमचे वजन कमी झालेले तुम्हाला दिसून येईल. यासह तुम्ही नियमित चालण्याचा व्यायामही करावा.
(वाचा – १ महिना साखर न खाल्ल्यास काय होतो आरोग्यावर परिणाम, शरीराला किती साखर आवश्यक)
तुळशी आणि काळी मिरी
आयुर्वेदानुसार, तुळशीची पाने आणि काळ्या मिरीमध्ये विटामिन सी, के, ए, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये हेल्दी फॅटसह अन्य औषधीय गुणही आढळतात जे वजन घटविण्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करावे. स्वतःच्या मनाने अजिबात सेवन करू नये.
तुळशी आणि काळ्या मिरीचा चहा
याशिवाय पोटावरील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काळी मिरी आणि तुळशीच्या पानांचा चहादेखील उपयोगी ठरू शकतो. अर्धा ग्लास पाण्यात तुळशीची पाने, काळी मिरी, गूळ, ओवा मिक्स करून पाणी उकळवा आणि चहा बनवा. या चहाचे नियमित सेवन केल्यास, शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत मिळते.
संदर्भ
https://www.sciencedirect.com/science/article/pii/S1756464621000980
[ad_2]