[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
स्वतःला ओळखणे गरजेचे
आपल्याला स्वतःचे अस्तित्व सर्व स्तरांवरून जाणून घ्यायला हवे. शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, गर्व आणि स्व हे त्याचे सर्व भाग आहेत. वर्तमानात जगलात तर आयुष्य सुखकर होते. त्यामुळे यासाठी आठवड्यातील एक दिवस निवडा. आपल्या अंतर्गत आरोग्याचा मेळ लयबद्ध करून घ्या.
सूर्याेदयासह उठा, योगाभ्यास करा, योग्य वेळी जेवा आणि आवडत्या संगीतामध्ये रममाण होत आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगला वेळ घालवा, जेणेकरून मनावर चांगला परिणाम होईल.
आपल्या आयुष्यात ध्यान समाविष्ट करा
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे ध्यान नियमित केल्याने तुमच्या आरोग्याला अधिक विश्रांती मिळते आणि आपले शरीर अधिक सक्रियपणाने काम करू शकते. यामुळे लक्ष केंद्रित होऊन मन शांत राहाते. पूर्ण अध्यात्मिक आरोग्यासाठी ध्यान हे एक वरदान आहे.
कोणत्याही रागाशिवाय, संकोचाशिवाय प्रतिक्रिया देणे आणि वर्तमानात जगणे हे याचे मूळ आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी ध्यानाचा आयुष्यात समावेश करून घेणे गरजेचे आहे असं श्री श्री रवि शंकर यांनी सांगितले आहे.
(वाचा – शौचाला तासनतास बसूनही होत नाही पोट साफ, रोज करा ५ सोपी योगासनं)
श्वसनक्रियेबाबत सजग व्हा
श्वास हे आपलं जीवन आहे मात्र शाळेत वा घरातही याच्या महत्त्वाबाबत कोणत्याही गोष्टी सांगितल्या जात नाहीत, जे जाणून घेणं गरजेचे आहे. आपल्याला आपल्या श्वासाच्या शक्तीबाबत समजावलं तर आपल्या आरोग्यात, विचारात आणि अनुभवात अधिक ज्ञानाची भर पडेल. आपल्या राग आणि नकारात्मकतेवर याचा अधिक चांगला परिणाम होतो असं श्री श्री रवी शंकर यांनी सांगितले आहे.
(वाचा – सांधेदुखीने हैराण असलात तर आजच डाएटमध्ये समाविष्ट करा हे पदार्थ, मिळतील अफलातून फायदे)
योग्य आहार घ्या
निरोगी शरीरासाठी आणि आपल्या भावना, विचार आणि कर्मांवर नियंत्रणासाठी आपण काय खातो हेदेखील महत्त्वाचे ठरते. ‘जसे अन्न तसे मन’ असे म्हटले जाते. आपण ज्या पद्धतीचे जेवण खातो त्याने आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो. ताजे अन्न, फळ आणि काही भाज्या या आपल्या शरीरात अधिक उर्जा निर्माण करतात.
जंक फूड अथवा प्रोसेस्ड फूड हे कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. ताजे आणि पौष्टिक जेवण असेल तर शरीरात उत्साह, स्फूर्ती, शक्ती टिकून राहाते आणि दीर्षायुष्य लाभते.
(वाचा – सकाळीच उपाशीपोटी प्या आयुर्वेदिक ड्रिंक, मिळतील ५ आरोग्यदायी लाभ)
स्वतःसाठी वेळ काढणे
आपण संपूर्ण दिवस कामात अथवा वेगवेगळ्या सूचना फॉलो करण्यात काढतो. त्यापेक्षा स्वतःसाठी काही वेळ काढला तर आरोग्य निरोगी राखण्यास मदत मिळते. जेव्हा तुम्हाला अधिक थकवा येतो अथवा तुम्ही उदास होता त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपल्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या. स्वतःसाठी वेळ काढावा. दिवसातून काही वेळ डोळे बंद करून लक्ष केंद्रित करा आणि सर्व ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न यातून करा.
[ad_2]