( प्रगत भारत । pragatbharat.com)
कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर वाहतूक कोंडीवरुन पोलिसांनी आयटी कंपन्यांसाठी एक निवेदन जारी केलं आहे.
बुधवारी बंगळुरु शहराला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गाड्या कित्येत तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या होत्या. यादरम्यान तर काही गाड्या बंदही पडल्या होत्या. वाहतूक कोंडीचा सर्वाधिक परिणाम आऊटर रिंग रोड (ओआरआर) परिसरात जाणवला. येथील लोक तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकले होते.
शेतकरी आणि कन्न्ड संघटनांनी ‘कर्नाटक जल संरक्षण समिती’कडून मंगळवारी बंगळुरु बंदची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही वाहतूक कोंडी झाली होती. हा बंद तामिळनाडूला कावेरी नदीचं पाणी सोडण्याच्या विरोधात होता.
वाहतूक कोंडीत अडकलेल्यांनी एक्सवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ऑफिसमधून निघाल्यानंतर आपण कशाप्रकारे वाहतूक कोंडीत अडकलो होतो याची माहिती दिली होती. यादरम्यान त्यांनी ऑफिसमधून निघणाऱ्यांसाठी सूचनाही केल्या होत्या. रात्री 9 आधी ऑफिसमधून निघू नका आणि ओआरआर, मराठाहल्ली, सरजापुरा और सिल्कबोर्डचे रस्ते टाळा.
एका युजरने एक्सवर लिहिलं आहे की, 3 तास वाहतूक कोंडीत अडकलो असून यादरम्यान फक्त 5 किमी अंतर पार करु शकलो आहे. हे फार भयानक आहे. तर एका युजरने एका तासात फक्त 2 किमी प्रवास केला असल्याचं सांगितलं. दरम्यान, एका युजरने दावा केला की, बंगळुरुत प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने शाळेची एक रात्री 8 वाजता त्यांच्या मुलांना घेऊन घरी पोहोचली.
वाहतूक कोंडीचं कारण काय?
बुधवारी बंगळुरुत झालेल्या या भीषण वाहतूक कोंडीमुळे कॉमेडियन ट्रेवर नोआने आपला कार्यक्रम रद्द केला. हा कार्यक्रम आऊटर रिंग रोंड क्षेत्रात होणार होता. कथितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ट्रेवर नोआ वाहतूक कोंडीत अडकला होता.
बंगळुरूच्या अनेक लोकांनी कॉमेडियन ट्रेवर नोआच्या शोची तिकिटे खरेदी केली होती. कार्यक्रमात पोहोचण्यासाठी ते कार्यालयातून लवकर निघाले होते. त्यामुळे ओआरआरवरील वाहनांची संख्याही वाढली. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी निघालेल प्रवासी 2 ते 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले.
बंगळुरूच्या रस्त्यांवरील वाहतुकीमुळे वाहनांची संख्या दुप्पट झाली होती. येथील वाहनांची संख्या दीड ते दोन लाखांपर्यंत असणार होती. मात्र, आयबीआय ट्रॅफिकच्या अहवालानुसार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत 3.59 लाख वाहने रस्त्यावर होती.
याशिवाय वीकेंड असल्याने लोक शहराबाहेर निघाले होते. त्यात पावसानेही या वाहतूक कोंडीत भर घातली. पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले. दुपारी 3.30 ते 5 या वेळेत अनेक वाहने रस्त्यांवर बंद पडली होती. त्याचबरोबर शहरातील बहुतांश भागात गणेश विसर्जन मिरवणूक निघाली असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.