काय रे देवा! आईच झाली मुलीची सवत; जावयावर जीव जडला अन् लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी केलं असं काही की…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Women Flew Away With Son In Law: एका आईनेच आपल्या पोटच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त केला आहे. जावयासोबत लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या हट्ट या महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना घडली असून गावच्या पंचायतीपर्यंत हे प्रकरण गेले आहे. महिलेच्या मुलाने आईला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ती आपल्या हट्टावर अडून बसली आहे. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतच सगळे संबंध तोडले आहेत. 

महिलेच्या या वागण्याने व्यथित झालेल्या कुटुंबीयांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिला सामाजिक मर्यादेचे भान राखण्याचाही इशारा दिला. मात्र तिने कोणाचेही ऐकण्यास नकार दिला. शेवटी महिलेचा मुलगा, पती आणि मुलीने तिच्याशी नाते तोडले आहे. तसे पत्रही त्यांनी पंचायतीकडे दिले आहे. 

जावयाच्या प्रेमात वेडी झाली

महिलेच्या मुलाने 20 जून रोजी पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली होती, तक्रारीत त्याने म्हटले आहे की, माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे. मात्र तरीही बहिणीच्या नवऱ्याने माझ्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व फूस लावून पळवून नेले आहे. दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. त्याच्यासाठी आईने घरात ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने चोरी केले.

मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जावयाचा आणि सासूचा शोध घेतला. बुधवारी दोघही पोलिसांना सापडले. त्यानंतर पंचायतीसमोर दोन्ही पक्षातील लोकांना बोलवण्यात आले. हे प्रकरण सोडवण्यासाठी पोलिस ठाण्याच्या बाहेरच पंचायत बोलवण्यात आली. यावेळी महिलेच्या मुलाने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, महिलेने घरातल्याना सोडपत्र देण्याचा निर्णय घेत जावयाचा हात पकडला आहे. लिखित स्वरुपात पत्रही तिने पोलिस निरीक्षकांना दिले आहे. 

मुलीची काळजी घेण्यासाठी गेली अन्…

महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या छळाला वैतागून मुलीने जून 2021 रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ट्रॉमा सेंटरमध्ये तिच्यावर अनेक महिने उपचार केल्यानंतर तिचा जीव वाचला होता. ती बरी होऊन घरी आल्यानंतर तिची काळजी घेण्यासाछी आईला जावयाच्या घरी पाठवले होते. त्याचवेळी दोघांमध्ये जवळीक वाढली. उपचारांनतरही त्याच्या बहिणीची मानसिक स्थितीत सुधार झाला नाही. याचाच फायदा दोघांनीही घेतला. 

जावयाच्या घरात राहत असतानाच दोघांचेही प्रेमाचे सूत जुळले. आईच लेकीची सवत बनून आल्याने परिसरात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, आईने आणि पतीनेच विश्वासघात केल्याने मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. 

Related posts