Weight Loss Breakfast Superfoods That Helps You Lose Belly Fat Instantly; त्वरीत वजन कमी करण्यासाठी खा असे सुपरफूड्स, गायब होईल पोटावरील लटकलेली चरबी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अंडे आणि मोड आलेले कडधान्य

अंडे आणि मोड आलेले कडधान्य

Eggs And Sprouts: अंड्यामध्ये प्रोटीन आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि एनर्जीच्या बाबतीत अंड्याला आणि मोड आलेल्या कडधान्यांना Power Meal असे म्हटलं जातं. या दोन्ही पदार्थांमुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत मिळते.

याशिवाय मोड आलेले कडधान्य ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने फायबर अधिक प्रमाणात मिळते आणि दिवसभर शरीरात उर्जा राहाते. यासह तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचाही समावेश करून घेऊ शकता. ज्यामुळे पोट भरलेले राहाते आणि वजन वाढत नाही.

फळं खा

फळं खा

Fruits: संत्रे, बेरीज, सफरचंद, केळी अशा फायबरयुक्त आणि विटामिन सी युक्त फळांचा नाश्त्यामध्ये समावेश केला तर त्याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. या फळांमध्ये कमी कॅलरी असून मिनरल्सचे प्रमाणही अधिक असते. दिवसभर उर्जा टिकवून जास्त भूक लागू न देण्यासाठी या फळांचा वापर करून घेता येतो.

(वाचा – रिकाम्या पोटी केळं खाण्याचे ७ फायदे, वजन कमी करण्यापासून शुगरवर नियंत्रण ठेवेपर्यंत जबरदस्त लाभ)

दही ठरेल उत्तम

दही ठरेल उत्तम

Curd For Weight Loss: नैसर्गिक प्रोबायोटिक असणाऱ्या दह्याचे नाश्त्यामध्ये सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला अधिक प्रोटीन आणि कॅल्शियम प्राप्त होते. तसंच अत्यंत कमी प्रमाणात कॅलरी शरीरात जाते. वजन कमी करण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे.

(वाचा – वजन वाढण्यासह येत असेल अति घाम तर मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या गंभीर आजाराचे आहेत हे ५ संकेत)

सकाळी कॉफी पिणे ठरते फायदेशीर

सकाळी कॉफी पिणे ठरते फायदेशीर

Coffee For Weight Loss: सकाळच्या वेळी एक कप कॉफी पिणेही फायदेशीर ठरते. शरीराला यामुळे जबरदस्त ऊर्जा मिळते आणि यातील समाविष्ट असणारे घटक हे वजन कमी करण्यासह मेटाबॉलिजम बुस्ट करण्यासाठीही मदत करतात.

तसंच ग्रीन टी पिणेही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील चरबी अथवा पोटावरील चरबी डिटॉक्सिफाय होते आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.

(वाचा – दाताच्या पिवळेपणापासून ते तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत गुणकारी ठरेल तुरटी, असा करा सोप्या पद्धतीने वापर)

आळशी आणि चिया सीड्स

आळशी आणि चिया सीड्स

Flax Seeds And Chia Seeds: आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आळशीचे दाणे आणि चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे काम करतात. तुमच्या नाश्त्यामध्ये Flax Seeds आणि Chia Seeds चा समावेश तुम्हा करून घेऊ शकता. यामुळे पोटावरील लटकलेली चरबी कमी होऊन डाएटरी फायबर वेट कमी होते आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरते.

संदर्भ

https://www.eatingwell.com/article/77715/the-best-breakfast-foods-for-weight-loss/

https://www.eatthis.com/best-breakfast-foods-to-lose-weight/

https://www.medicalnewstoday.com/articles/326288

[ad_2]

Related posts