[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं वय
Iron Man मिलिंद सोमणने या प्रश्नाला उत्तर देताना त्याने आपल्या आईचा म्हणजे उषा सोमण यांच्या फिटनेसचा दाखला दिला. मिलिंद सोमणच्या आईचं वय हे ८० च्या पुढे आहे आणि आजही त्या फिट आहेत. मिलिंद सोमण म्हणतो की, मला त्यांच्या वयापर्यंत इतकं फिट राहायचं आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्याची विशेष काळजी घेतो.
सामान्य जीवन विसरलोय-मिलिंद
मिलिंद या मुलाखतीत म्हणतो की, आपण सामान्य किंवा नॉर्मल आयुष्य विसरलो आहे. आपले पूर्वज किंवा आजी-आजोबा खूप चालायचे. आजही काही महिला पाण्यासाठी तीन तीन किमी किंवा त्याहून अधिक चालतात. तर आपण चालणं विसरलो आहोत. चालणं आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे.
बसणं शरीरासाठी घातक
मिलिंद सोमण पुढे म्हणाला की, शहरात टेन्कॉलॉजी आणि इलेक्ट्रिसिटी पोहोचली आहे. त्यामुळे चालणं बऱ्यापैकी कमी झालं आहे. त्यामुळे बसणं वाढलं आहे आणि पर्यायाने मूळ फिटनेस कमी झाला आहे. आज शहरांमध्ये चालणं कमी झाल्यामुळे आजार वाढले आहेत. १०० मीटरही चालणे लोकांना होत नाही.
(वाचा – सांध्यांमध्ये जमा झालेल्या युरिक अॅसिडला सहज साफ करतील ५ घरगुती उपाय, दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम)
धावणे किती महत्वाचे
धावण्यामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. दिवसभरातून १२ ते १५ हजारांपर्यंत पाऊलं चालणे गरजेचे असते. धावणे नाही जमले तरीही जलद गतीने आणि जोमाने चालणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे अनेक गंभीर आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी धावणे, चालणे अतिशय गरजेचे आहे.
(वाचा – पचनाच्या समस्येने हैराण असाल तर ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या १० टिप्स फॉलो करा, काय खावं आणि काय खाऊ नये?)
उषा सोमण यांचा फिटनेस
मिलिंद सोमणची आई उषा सोमण यांनी २५ वर्षांनंतर सायकल चालवली आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांचा फिटनेस तरूणांना लाजवेल असा आहे. उषा सोमण या वयातही अतिशय ऍक्टिव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उषा सोमण यांच्या Push-Up च्या व्हिडीओचं कौतुक केलं होतं. मिलिंद सोमणही आपल्या आईच्या फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असतो.
(नोट – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मिलिंद सोमण यांच्यातील संवाद हिंदीत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा)
[ad_2]