Indore Car falls into pond father jumps for 12 year old girl sitting inside thrilling video exposed;कुंडमध्ये कोसळली कार, आत बसलेल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी वडिलांनीही घेतली उडी, थरारक व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indore Car Falls Into Pond: इंदूरजवळील पर्यटन स्थळावर एक कार तलावात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाल रंगाच्या या कारमध्ये 12 वर्षांची मुलगी बसली होती. ही घटना पाहताच परिसरात खळबळ माजली. कार पाठोपाठ मुलीच्या वडिलांनीही मागून तलावात उडी घेतली. त्या दोघांना वाचविण्यासाठी आजुबाजूच्या लोकांनीही पाण्यात उड्या घेतल्या. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. नेमका हा प्रकार काय घडला? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

सिमरोलपासून 20 किमी अंतरावर असलेल्या घाट परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. लोधिया तलाव हे सिमरोल घाट विभागाच्या आत 10 किलोमीटर अंतरावर आहे. इकडे बिजलपूर येथे राहणारा टूल्स व्यापारी तैयब अली पत्नी झेहरा आणि 12 वर्षांची मुलगी जौनकसोबत फिरायला आला होता. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीत बिजलपूरचे आणखी चार ओळखीचे मित्र परिवार होते. तायब यांनी तलावाच्या काठावर कार उभी केली आणि हँड ब्रेक लावून पत्नी आणि मुलीसह खाली उतरले. 

दरम्यान कपडे बदलत असताना तैयबच्या गाडीचा हॅंण्ड ब्रेक निघाला. यावेळी 12 वर्षांची जौनक कारमध्ये एकटीच होती. तिथला रस्ता निसरडा असल्याने गाडी घरंगळत पुढे आली आणि थेट तलावात कोसळली. 

गाडी कोसळल्याचे तैयबने पाहिले. मुलगी गाडीत होती. म्हणून मागचा पुढचा काहीच विचार न करता तैयबने पाण्यात उडी मारली. त्यानंतर त्याच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. शेजारी उभ्या असलेल्या लोकांनीदेखील मुलगी आणि तिच्या वडिलांना वाचविण्यासाठी एका मागोमाग एक पाण्यात उड्या मारल्या. काही क्षण काय चालले आहे हे बघणाऱ्यांना कळतच नव्हते.

आधी त्याने बॅरिगेट्स तोडले नंतर मागे फिरुन कर्मचाऱ्याला चिरडले, टोलनाक्यावर कारचालकाचा माज व्हिडीओत कैद

दुसरीकडे इंदूरमधील सुमित मॅथ्यू हा घटनेच्या वेळी तिथे उपस्थित होता. त्याने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि लोकांच्या मदतीने गाडीचे गेट उघडून मुलीला बाहेर काढले. तसेच मुलीच्या वडिलांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने दोघेही सुखरुप आहेत. दोघेही जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Viral Video: ‘ती तुझ्याकडे बघून हसली’..मित्रांचं ऐकून केलं प्रपोज, मुलावर चप्पलेनं मार खाण्याची वेळ

कार पूलमध्ये पडली तेव्हा तिच्या चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडा होता. गाडीच्या बोनेटवरही कपडे ठेवले होते. बहुधा कुटुंब बोनेटवर ठेवून काहीतरी खात असावे, असा अंदाज लावला जात आहे.

कारचा दरवाजा बंद असता तर मुलीला वाचविणे कठीण गेले असते असे एका प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. 

Related posts