HDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com)

HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. 
खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे.  व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45% आणि दोन वर्षे ते दहा वर्षांच्या कालावधीवर 7.2% रिटर्न देत आहे.

सर्वात आधी नॉन-विथड्रॉवल एफडी म्हणजे काय ते समजून घेऊया. नॉन-विथड्रॉवल एफडीमध्ये ठेवींची मुदत संपण्यापूर्वी ठेवीदार या एफडी बंद करू शकत नाहीत. असे असले तरी कोणत्याही न्यायालय/कायदेशीर/दिवाळखोरी आणि/किंवा नियामक प्राधिकरणांकडून किंवा मृत दावा निकाली काढण्याची प्रकरणे या अपवाद ठरतात. अशा स्थितीत बॅंक त्यांच्या ग्राहकांना ठेवी वेळेपूर्वी काढण्याची परवानगी देऊ शकते.  या ठेवी वेळेपूर्वी काढल्या गेल्यास (डेड क्लेम सेटलमेंट वगळता) बँक ठेवीच्या मूळ रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अशा वेळेपूर्वी बंद होण्याच्या तारखेपर्यंत जमा केलेले किंवा भरलेले कोणतेही व्याज हे जमा असलेल्या रकमेतून वसूल केले जाईल. मृत्यूच्या दाव्यामुळे या एफडी वेळेपूर्वी काढल्या गेल्यास, दावेदाराला व्याज द्यावे लागते.

HDFC बँकने 2 कोटींपेक्षा जास्त किंवा समतुल्य रकमेसाठी नॉन-विथड्रॉवल एफडी दर जाहीर केले आहेत. त्यानुसार 1 वर्ष ते 15 महिने- 7.45%, 15 महिने ते 18 महिने 7.45%, 18 महिने ते <21 महिने 7.45%, 21 महिने ते 2 वर्षे 7.45%, 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे 7.2%, 3 वर्षे १ दिवस ते ५ वर्षे ७.२% आणि 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांसाठी 7.2% व्याजदर असेल. 

एचडीएफसी बँकेचे नवीन एफडी दर

एचडीएफसी बॅंकेने दिलेल्या नव्या अपडेटनुसार बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर सामान्य ग्राहकांना 3% ते 7.20% पर्यंत व्याजदर देत आहे. काही दिवसांपूर्वी, येस बँकेने 21 नोव्हेंबर 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी निवडक कालावधीवरील FD व्याजदरात वाढ केली आहे.

Related posts