Yoga For Weight Loss 4 Poses To Reduce Belly Fat; खाणंपिणं न सोडताही पोटावरची चरबी विरघळून मिळेल परफेक्ट फिगर, करा ४ योगासने

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

प्लँक पोझ

प्लँक पोझ

Plank Pose: प्लँक पोझ ही तुमच्या शरीराचा आकार योग्य व्हावा यासाठी परफेक्ट योगा पोझ आहे. नियमित प्लँक केल्यास, तुमचे खांदे, पाठ, मांड्या आणि कोर मजबूत होण्यास मदत मिळते. मलायकासारखी फिगर हवी असेल तर योगा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल.

असे करावे प्लँक

  • सर्वात पहिले प्लँक करण्यासाठी पुश-अप पोझिशनमध्ये याआपले हात, मनगट आणि कोपराच्या आधाराने आपलं शरीर जमिनीपासून वर घ्या
  • खाली पाहा आणि मानेला आराम द्या. जितका वेळ शक्य आहे अशा योगा पोझिशनमध्ये राहा

धनुरासन

धनुरासन

Bow Pose: पोट आणि पाठीचा आकार योग्य करण्यासाठी आणि पोटाची चरबी विरघळविण्यासाठी धनुरासन उत्तम पोझ आहे. धनुरासन नियमित केल्याने पोटाचा भाग आत जातो आणि मजबूत होतो. याशिवाय या योगासनामुळे पाठ, छातील, पोट, पाय, कुल्ले आणि हातावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

  • योगा मॅटवर पोटाच्या बाजूने झोपा आणि त्यानंतर गुडघ्यातून पाय मागच्या बाजूने वर घ्या
  • दोन्ही हात मागे करून पावलं पकडा
  • त्यानंतर तुमच्या छातीकडून वर व्हा आणि मांड्यांकडूनही दुसऱ्या बाजूने वर व्हा
  • श्वास घेत राहा आणि साधारण २० सेकंद या पोझिशनमध्ये तसंच राहा. वजन कमी होण्यास मदत मिळते

त्रिकोणासन

त्रिकोणासन

Triangle Pose: त्रिकोणासन हे शरीरातील रक्तप्रवाह वाढविण्याचे काम करते आणि पाठदुखीपासून सुटका मिळवून देते. तसंच तुमच्या कंबर आणि पोटाजवळील जमलेली चरबी घटविण्यासाठीही या योगासनाची मदत मिळते. हे योगासन करण्यासाठी तुम्हाला साधारण दोन्ही पायांमध्ये ३ फुटाचे अंतर ठेवण्याची आवश्यकता आहे.

  • पायांमध्ये अंतर ठेवल्यानंतर तुम्ही खाली वाका आणि डावा पाय थोडासा उजव्या बाजूला वाकवा आणि उजवा पाय पुढे ठेवा
  • डावा हात पसरवा आणि जमिनीवर टेकवा आणि दुसरा हात आकाशाच्या दिशेने वर घ्या. २०-३० सेकंद असेच राहा आणि मग दुसऱ्या बाजूला अशीच पोझ करा

ब्रिज पोझ

ब्रिज पोझ

Bridge Pose: ब्रिज पोझ हे तुमच्या मसल्सचे टोन अधिक चांगले करण्यास मदत करतात आणि याच्या मदतीने वजन त्वरीत कमी करण्यास फायदा होतो.

  • यासाठी योगा मॅचवर पाठीवर झोपा
  • आपले गुडघे आतल्या बाजूने वाकवा आणि आपले धड वर करा
  • आपले हात कुल्ल्याखाली ठेवा आणि डोकं आणि मान ही सपाट ठेवा. या योगासनामुळे वजन लवकर कमी होते

[ad_2]

Related posts