Odisha Train Accident: मृतांची संख्या 288 वरुन 275 वर; नक्की घडलं तरी काय? सरकारने केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशा (Odisha News) तिहेरी रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशाला हादरवलं आहे. दोन प्रवासी रेल्वे गाड्या आणि एक मालगाडी यांच्या धडकेत शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो जण या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बालासोरच्या एका शाळेमध्ये मृतांचा खच पडला होता. त्यानंतर हे मृतदेह विविध रुग्णालयात नेण्यात आले. या भीषण अपघातामुळे या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. दुसरीकडे या अपघातातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मृतदेहांच्या मोजणीत काही चूक झाली असल्याची माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.…

Read More

“हिनेच माझं आयुष्य खराब केलं,” प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, Facebook वरुन पोस्ट केली सुसाईड नोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे (Suicide) खळबळ माजली आहे. राहुल यादव या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. कुटुंबाला घरातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ माजली आहे. तरुणाच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे. तसंच आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आपल्या प्रेयसीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून,…

Read More