[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मेवा
सुक्या मेव्यामध्ये सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. बदाम, काजू, अक्रोड इत्यादींसोबत मनुका खाल्ल्याने मिठाईची लालसा कमी होऊ शकते. NCBI संशोधनानुसार, त्यात नैसर्गिक साखर असते आणि ती भूक कमी करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे गोड असूनही वजन वाढत नाही. मात्र, तरीही हे नियंत्रणातच खावे.
(वाचा :- Madhuri Dixit चे पती डॉ नेनेनी दिले पोलादी गुडघ्यांसाठी 5 उपाय, वयाच्या 60 नंतरही लागणार नाही मणका-हाडांना धक्का)
गूळ
गूळ खाल्ल्याने खराब पचनक्रियाही दूर होते. साखरेला हा एक उत्तम पर्याय आहे. हे खाल्ल्याने निरोगी व्यक्तीची मिठाईची लालसा सहज संपुष्टात येते. गुळ हा लोह, प्रथिने, कॅल्शियम, अनेक जीवनसत्त्वे यांचा मजबूत स्रोत आहे.
(वाचा :- दातांवर चिकटलेला काळा पिवळा जाडसर थर हे 8 पदार्थ करतात चकाचक, हि-यांगत चमकते बत्तीशी, होत नाही हिरड्यांचा कॅन्सर)
स्टीव्हियाची पाने
आता पुढच्या वेळी मन मारून फिकी चहा-कॉफी पिण्याची गरज नाही. ह्या चहा-कॉफी मध्ये स्टीव्हियाची पाने घाला. हे एक नैसर्गिक स्वीटनर आहे, जे मधुमेहामध्ये देखील सुरक्षित मानले जाते. मात्र, योग्य प्रमाणाची काळजी घ्यायला विसरू नका.
(वाचा :- Diabetes असो किंवा नसो, हात-पाय सहीसलामत ठेवण्यासाठी रोज करा ही 6 कामे, येणार नाही अवयव कापून वेगळे करायची वेळ)
मध
मधामध्ये अँटी-इन्फ्लमेट्री आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. साखरेला हा एक नैसर्गिक पर्याय आहे, जो खूप आरोग्यदायी आहे. तुम्ही ते रोज नियंत्रित प्रमाणात याचे सेवन करू शकता. पण मधुमेही रुग्णांसाठीही ते हानिकारक ठरू शकते.
(वाचा :- मूळव्याधाचे फोड नष्ट करतात ‘या’ 5 देसी भाज्या, बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांत साचलेला शौच व घाण चुटकीसरशी पडते बाहेर)
फळे
गोड खाण्यासोबतच जर पोषण मिळाले तर किती भारी ना, मंडळी यासाठी सफरचंद, केळी, आंबा इत्यादी फळे खा. यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास नुकसान करत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवते.
(वाचा :- अशा प्रकारच्या खोकल्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, ही 5 लक्षणे ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला झाला Lung Cancer)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]