( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या.
56 दिवस आणि 1 तिकिट अशी एक योजना रेल्वेची आहे. त्यामुळं तुम्हाला सतत तिकिट काढण्याची गरज नाहीये. भारतीय रेल्वेच्या या योजनेला सर्कुलर सुविधा असं म्हणतात. याअंतर्गंत रेल्वेकडून प्रवाशांना 56 दिवसांपर्यंत एकाच तिकिटांवर प्रवास करण्याची मुभा आहे. त्या काळात तुम्हाला टिसीदेखील पकडू शकत नाही.
काय आहे सर्कुलर यात्रा
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेल्वेकडून तुम्हाला एक कन्फर्म तिकिट घ्यावे लागणार आहे. हे तिकिट सर्कुलर यात्रेसाठी असेल. त्यानंतर तुम्ही 56 दिवस आरामात ट्रेनने फिरु शकतात.
नेमकं काय करावं लागेल?
उदाहरणार्थ, तुम्हाला जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत फिरायला जायचे आहे. त्याचबरोबर या दोन्ही प्रदेशाच्या दरम्यानची शहरे व पर्यटनस्थळांनाही तुम्हाला भेट द्यायची आहे. अशावेळी तुम्ही या प्रवासादरम्यान मध्येच उतरु शकतात. व तिथली पर्यटनस्थळांचाही आनंद घेऊ शकतात. मात्र, हे तिकिट बुक करण्याच्या आधी तुम्हाला रेल्वेला ही माहिती द्यावी लागते. एकदा का तुमचे तिकिट बुक झाले की तुम्हाला पुन्हा तिकिट काढण्याची गरजच भासणार नाही. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही आरामात 56 दिवस फिरु शकणार आहात.
कुठे मिळेल तिकिट?
या योजनेअंतर्गंत तुम्हाला ऑनलाइन तिकिट बुक करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे काउंटरवर प्रत्यक्ष जाऊन तिकिट खरेदी करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या शहरातून तुमचा प्रवास सुरू करत आहात आणि मध्येच कोणत्या शहरात उतरणार आहात आणि त्यानंतर पुन्हा प्रवास कधी सुरू करत आहात, याची माहिती द्यावी लागेल. तुमच्या प्रवासाची सगळी माहिती दिल्यानंतर तुमचं तिकिट तयार केले जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास सुरू करु शकणार आहात.